देशांतर्गत क्रिकेटसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. भारताचे माजी खेळाडू विजय दहिया यांना आगामी देशांतर्गत हंगामाआधी उत्तर प्रदेश क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात नियुक्त केले गेले आहे. यापूर्वी विजय दहिया दिल्ली क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. आगामी सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशचा संघ त्यांच्या मार्गदर्शनात चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केरेल.
विजय दहिया यांनी यापूर्वी उत्तर प्रदेश संघाचे प्रशिक्षक असलेले ज्ञानेंद्र पांडेंची जागा घेतली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (यूपीसीए) त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट केली आहे आणि त्यामध्ये लिहिले आहे की, “आम्ही विजय दहिया यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या सर्व स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एका अप्रतिम प्रवासाची आशा करतो.”
#TeamUPCA welcomes our newly appointed head coach, Ex-team India Wicket-Keeper & Batsman – Mr. @vijdahiya ! ????????
We look forward to a fantastic journey for achieving all our dreams under his proven mentorship.#UnstoppableUP #UPCA pic.twitter.com/Q6RAVKgIaf— UPCA (@UPCACricket) September 30, 2021
दहियां यांच्याकडे दिल्लीच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाचा आणि त्याचसोबत आयपीएलमध्ये सपोर्ट स्टाफचा भाग राहिल्यामुळे तो देखील अनुभव आहे. त्यांनी कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या सहायक प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली आहे. तसेच त्यांनी दिल्ली कॅपिटल्स संघासाठीही ही जबाबदारी पार पाडली आहे.
दहिया यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत २००० ते २००१ या काळात भारतीय संघासाठी २ कसोटी आणि १९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांचे देशांतर्गत क्रिकेटमधील कराकिर्द आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत जास्त यशस्वी ठरली आहे.
युपी त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०२१-२२ च्या देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ४ नोव्हेंबरला ग्रुप ई मध्ये चंदिगड संघाविरुद्धच्या सामन्यातने अभियानाला सुरुवात करणार आहे. माजी प्रशिक्षक ज्ञानेंद्र पांडेच्या मार्गदर्शनात युपी संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये निराशाजनक प्रदर्शन केले होते. मात्र, विजय हजारेमध्ये संघाने चांगले प्रदर्शन केले होते आणि उपविजेतेपद पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारे ५ फलंदाज, भारताच्या ‘रनमशीन’चाही समावेश
फॉर्ममध्ये परतण्याचे ‘हे’ आहे कारण, चहलने केला खुलासा; आता टी२० विश्वचषकासाठीही मिळू शकते संधी
‘आजही काहीच नाही बदललं यार!’ धोनीचा विजयी षटकार पाहून ‘या’ माजी खेळाडूने दिली प्रतिक्रिया






