---Advertisement---

‘नाहीतर व्हाल शून्यावर बाद,’ म्हणतं विराटला ट्रोल करणाऱ्या उत्तराखंड पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

On: रविवार, मार्च 14, 2021 11:32 AM
---Advertisement---

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे शुक्रवारी (१२ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला टी२० सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने भारताला ८ विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडला तंबूत परतला. ज्यावरून उत्तराखंड पोलिसांनी त्याला ट्रोल केले होते. मात्र आता त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

उत्तराखंड पोलिसांनी मांडली त्यांची बाजू
प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर केएल राहुल अवघ्या ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फंलदाजीला आला होता. मात्र इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात विराट मिड ऑफवरील क्षेत्ररक्षकाच्या हाती झेल देत बाद झाला. त्याने ५ चेंडूंचा सामना करताना एकही धाव केली नाही. यानंतर तो शून्यावर बाद झाला हे पाहून उत्तराखंड पोलिसांनी मजेशीर ट्विट केले.

त्यांनी ट्विटमध्ये विराटचा बाद झाल्यानंतर निराश होऊन मैदानाबाहेर जातानाचा फोटो टाकला. त्यावर लिहिले की, “हेल्मेट घालणेच केवळ पुरेसे नसते. पूर्ण खबरदारी घेऊन गाडी चालवणे आवश्यक आहे. नाहीतर विराट कोहलीसारखे तुम्हीही शून्यावर बाद होऊ शकता.”

त्यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केले. यानंतर आपली बाजू मांडत त्यांनी नव्या ट्विटमध्ये लिहिले की, “वाहतूक सुरक्षेबाबत जनतेला जागरुक करणे हाच विराटसंदर्भात ट्विट करण्यामागचा आमचा उद्देश होता. हा एक सर्वसाधारण संदेश होता. याद्वारे कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.”

पहिल्या टी२० सामन्यात श्रेयस अय्यरला वगळता विराटसह इतर खेळाडूंनाही साजेशी कामगिरी करता आली नाही. अय्यरच्या ६७ धावांच्या खेळीमुळे भारताला निर्धारित २० षटकांत केवळ १२४ धावा करता आल्या. इंग्लंडने हे सोप्पे लक्ष्य १५.३ षटकांतच गाठले. सलामीवीर जेसन रॉयने ४९ धावांची खेळी केली. पहिल्या डावात ३ बळी घेणार्‍या जोफ्रा आर्चरला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

“आज चक्रवर्ती संघाबाहेर झालाय, कुणास ठाऊक कधी रोहित-पंत फिटनेस टेस्टमध्ये फेल होतील”

हे काय नवीनच! ‘थाला’ने घेतला संन्यास? बौद्ध भिक्षू अवतारातील फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ 

Video: अरर! फिल्डरने मुद्दाम सीमारेषेबाहेर ठेवला पाय अन् पकडला चेंडू, पंचांनी पूर्ण संघाला दिली शिक्षा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---