---Advertisement---

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे होणार निलंबन? कुस्तीपटूंचे आंदोलन पोहचले आंतरराष्ट्रीय स्तरावर

On: बुधवार, मे 31, 2023 11:29 PM
---Advertisement---

एप्रिल महिन्याच्या अखेरपासून भारतीय कुस्तीपटू नवी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते. शेवटी रविवारी (28 मे) कुस्तीपटूंचे हे आंदोलन उठवण्यात आले. कुस्तीपटूंसोबत झालेल्या कारवाईवर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. आता या प्रकरणात थेट जागतिक कुस्ती महासंघाने लक्ष घातले असून, भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूक लवकरात लवकर घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.

जंतर-मंतर येथे दिल्ली पोलिसांनी विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांच्यासह ऑलिम्पिक तसेच जागतिक अजिंक्यपद पदक विजेत्यांसोबत अनेक समर्थकांना अटक केली होती. कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांनी सुरक्षा घेरा तोडून महिला ‘महापंचायत’साठी नव्या संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.

याप्रकरणी निराश झालेल्या जागतिक कुस्ती महासंघाने प्रतिक्रिया देताना म्हटले,

“महासंघ कुस्तीपटूंना मिळालेल्या वर्तणुकीमूळे निराश आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.”

यासोबतच महासंघाने सांगितले आहे की भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूका 45 दिवसांमध्ये घेण्यात याव्या. असे न घडल्यास भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे भारतीय कुस्तीपटूंना कोणत्याही स्पर्धेत भारताचा ध्वज व देशाचे नाव वापरता येणार नाही.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक अत्याचाराचा आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्यावर एफआयआर नोंद झाली असली तरी, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. याच मुद्द्यावर खेळाडू आंदोलन करताना दिसतायेत.

(UWW Upset On Behaving With Wrestler In Protest Against WFI President Brijbhushan Singh)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---