---Advertisement---

वैभव सूर्यवंशीला इंग्लंडमध्ये मिळाला पहिला धडा, क्रीजवर टिकायचे असेल तर ‘ही’ सवय बदलावी लागेल!

On: गुरूवार, जुलै 9, 2026 6:00 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. भारताच्या या युवा स्फोटक फलंदाजाने पहिल्याच मालिकेत त्याच्या प्रतिभेची झलक दाखवली, मात्र त्याला आतापर्यंत एकही मोठी आणि महत्त्वपूर्ण खेळी करता आलेली नाही. त्याच्या कारकिर्दीला नुकतीच सुरूवात झाल्याने त्याचे मूल्यांकन करणे घाईचे ठरेल, मात्र त्याची एक कमकुवत बाजू समोर आली आहे.

आयपीएलमध्ये जागतिक दर्जाच्या गोलंदाजांनी धुलाई करणाऱ्या वैभवला इंग्लंडविरुद्ध टी २० पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याची कामगिरी पाहता त्याला अंतिम अकरामध्ये स्थान दिले जावे, या मागणीला जोर धरला होता आणि ते इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात घडले.

आतापर्यंत वैभवने दोन सामने खेळले आहेत, मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये तो लवकरच विकेट गमावून बसला. यामध्ये त्याने २-३ षटकार मारून आपली तयारी दर्शवली, पण त्याचबरोबर एक कमकुवत बाजूही उघड केली.

नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी २० सामन्यात वैभवने सलामीला येताच दोन षटकार मारत चांगली सुरूवात केली, मात्र पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो तिसऱ्या षटकात जोफ्रा आर्चरने टाकलेल्या आखूड चेंडूवर हुक शॉट मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

इंग्लंडमध्ये आयपीएलसारखी फलंदाजी करणे सोपे नाही?
कारकिर्दीच्या सुरूवातीलाच वैभवला एक धडा मिळाला आहे, ज्याचा त्याने आपल्या खेळात लवकर समाविष्ट केला पाहिजे. त्याने आयपीएलमध्ये सर्व प्रकारच्या चेंडूंचा सामना करताना चांगले शॉट्स खेळत सीमारेषेबाहेर मारले होते.

फरक इतका की आयपीएलमधील खेळपट्ट्या फलंदाजासाठी अनुकूल होत्या. बहुतेकवेळा खेळपट्ट्या सपाट असत, त्यामुळे चेंडू चांगल्या उंचीसह बॅटवर येत असे.

वैभवने क्रीजवर टिकण्यासाठी काय केले पाहिजे?
इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेमधील खेळपट्ट्यांवर चेंडू अनेकदा अधिक उसळी घेतो. जास्त वेगामुळे, बाउन्सवर पुल किंवा किंवा हुक शॉट खेळणे अनेकदा कठीण जाते. यामुळे टायमिंग चुकण्याचा आणि झेल सुटण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक बाउन्सरवर शॉट मारण्याचा प्रयत्न करणे शहाणपणाचे नाही.

बाउन्सरविरुद्ध पारंपरिक तंत्र अधिक योग्य. म्हणजे वाकून बाउन्सर जाऊ देणे, हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. एका षटकात दोनपेक्षा अधिक बाउन्सर टाकण्याची परवानगी नसते. त्यामुळे ते चेंडू टाळणे अधिक फायदेशीर आणि वैभवला हीच गोष्ट लवकरात लवकरत आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.

आज (९ जुलै) इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा टी २० सामना खेळला जाणार आहे. यामध्ये वैभव कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष असणार आहे. (Vaibhav Sooryavanshi learns his first lesson in England to stay at the crease, he must change ‘this’ habit!)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---