---Advertisement---

Ranji Trophy: बिहारच्या युवा क्रिकेटपटूने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरपेक्षा कमी वयात केले रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण

Vaibhav-Suryavanshi-Ranji-Debut
---Advertisement---

Youngest Ranji Trophy Debut: बिहारचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचला आहे. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करून त्याने नवा विक्रम केला. पटना येथे मुंबई आणि बिहार यांच्यात रणजी ट्रॉफी सामना खेळला जात असून या सामन्यात 14 वर्षांचा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीही बिहारकडून खेळत आहे.

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याचे खरे वय किती आहे हे पूर्णपणे स्पष्ट झाले नसले तरी तो निश्चितपणे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या सर्वात तरुण क्रिकेटपटूंपैकी एक आहे. इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार सूर्यवंशी 12 वर्षांचा आहे परंतु त्यानी एका मुलाखतीत सांगितले होते की, तो सप्टेंबर 2023 मध्ये 14 वर्षांचा झाला आहे.

वैभव सूर्यवंशी हा देखील भारताच्या 19 वर्षांखालील ब संघाचा भाग आहे. या संघाने इंग्लंड आणि बांगलादेशसोबत चतुर्भुज मालिकेत भाग घेतला होता. या मालिकेदरम्यान वैभवने पाच सामन्यात 177 धावा केल्या होत्या. या काळात त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक निघालं होतं. (vaibhav suryavanshi becomes one of the youngest players to feature in indian first class cricket)

याशिवाय सूर्यवंशी यानी विनू मंकड ट्रॉफी 2023 मध्येही भाग घेतला आहे. त्यादरम्यान, त्याने पाच सामन्यांत 393 धावा केल्या होत्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आठव्या क्रमांकावर होता. याशिवाय कूचबिहार ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 151 आणि 76 धावांची इनिंग खेळली होती. या तरुण क्रिकेटपटूने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि वयाच्या सातव्या वर्षी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. त्याने माजी रणजी क्रिकेटपटू मनीष ओझा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.

तर भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने वयाच्या 15 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. (Bihar’s young cricketer creates history makes Ranji Trophy debut younger than Sachin Tendulkar)

हेही वाचा

T20 World Cup: टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान एकाच गटात; बाकीची नावे आश्चर्यचकित करणारी, पाहा संपूर्ण यादी
AUS vs PAK: डेव्हिड वॉर्नरसाठी आनंदाची बातमी, फेअरवेल टेस्ट मॅचमध्ये हरवलेली ‘बॅगी ग्रीन’ मिळाली परत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---