आयपीएल 2025 स्पर्धेतील 36 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला लखनऊ विरुद्ध (LSG vs RR) अवघ्या दोन धावांनी पराभव पत्करावा लागला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) दुखापतीच्या कारणाने बाहेर पडला, त्यामुळे वैभव सूर्यवंशीला (vaibhav suryavanshi) पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तो आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात कमी वयातील खेळाडू ठरला आहे. सर्वांना प्रतीक्षा होती की, हा खेळाडू कसं प्रदर्शन करेल पण कोणी विचारही केला नसेल की 14 वर्षांचा खेळाडू असं काहीतरी करेल. वैभवने त्याच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरला (Shardul thakur) षटकार झळकावत सर्वांना आश्चर्यचकित केले. तो 34 धावा करून बाद झाला मैदानावरून परत जाताना तो खूप भावुक झाला. त्याने वीस चेंडूत 34 धावा केल्या.
Great Beginning! 6️⃣????
— Star Sports (@StarSportsIndia) April 19, 2025
14-year-old debutant #VaibhavSuryavanshi announces himself in style – smashing the very first ball he faces in the IPL for a SIX! ????
This is truly #IndianPossibleLeague ????????
Watch the LIVE action ➡ https://t.co/3WHRLHfS94 #IPLonJioStar ???? #RRvLSG | LIVE… pic.twitter.com/GeF8rnOLYD
181 धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने (yashasvi jaiswal) डावाची चांगली सुरुवात केली होती, दोघांनी मिळून 85 धावांची चांगली भागीदारी रचली. वैभव 9 व्या षटकातील चौथ्याच चेंडूवर स्टंप आऊट झाला.
पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स सामना जिंकता जिंकता पराभूत झाले. मागच्या सामन्या प्रमाणेच या सामन्यात सुद्धा राजस्थान शेवटच्या षटकात 9 धावा करू शकला नाही. आवेश खानने ( Aavesh khan) शेवटच्या दोन षटकात लखनऊसाठी गोलंदाजी केली आणि इथेच त्याने सामना फिरवला. त्याने यशस्वी जयस्वाल, रियान पराग तसेच शिमरॉन हेटमायर यांना बाद करत लखनऊला शानदार पद्धतीने सामना जिंकवून दिला.






टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा