क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची शानदार फलंदाजी आजही चाहत्यांना आठवते. पाँटिंग जेव्हाही मैदानावर फलंदाजी करत होता, तेव्हा गोलंदाजांना घाम फुटत होता. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीची दहशत आजही गोलंदाजांमध्ये आहे. तसेच पाँटिंगची क्रिकेट कारकीर्द जितकी शानदार राहिली, तितकेच त्याचे वैयक्तिक आयुष्यही रोमांचक आणि मजेशीर होते.
त्याच्या लव लाईफविषयी बोलताना पाँटिंगची प्रेमकथा बर्यापैकी फिल्मी आहे. त्यातही सध्या वॅलेंटाईन्स विक सुरु असल्याने प्रमाचे वारे वाहत आहे. त्याच निमित्ताने आज आपण यालेखात पाँटिंग (Ricky Ponting) आणि रियाना जेनिफरच्या (Rianna Jennifer) लव्ह लाईफबद्दल जाणून घेणार आहोत.
दोघांची लव्ह लाईफ जेनिफर आपल्या भावासोबत मेलबर्नमध्ये (Melbourne) सामना पहायला आल्यानंतर सुरु झाली होती. तेव्हापर्यंत पाँटिंग क्रिकेट जगतात प्रसिद्ध झाला होता. तर जेनिफर एक विद्यार्थीनी होती. मजेशीर गोष्ट अशी की, त्या स्टेडियममध्ये पाँटिंगच्या कुटुंबातील व्यक्तीही सामना पहायला आले होते. जेव्हा सामन्यादरम्यान ब्रेक झाला, तेव्हा तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तेथे आला होता. तेव्हाच पाँटिंगची नजर जेनिफरवर पडली आणि तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता.
https://www.instagram.com/p/CBuWtKwBzNM/
नाताळचा काळ होता आणि मेलबर्नमध्ये सामना सुरु होता. जेनिफरचा विचार पाँटिंगच्या डोक्यातून जातच नव्हता. तो जेनिफरला भेटण्यासाठी इतका उत्सुक होता की, सामना झाल्यानंतर तो तिला शोधत शोधत तिच्या विद्यापीठापर्यंत गेला होता. जेव्हा जेनिफरला माहित झाले की तो तिच्यासाठी इथे आला होता, तेव्हा ती स्वत:देखील आश्चर्यचकीत झाली होती. त्यानंतर जेनिफरने त्याची भेट घेतली आणि पाँटिंगने आपल्या मनातील सर्वकाही तिला सांगितले.
जेनिफरदेखील पाँटिंगसाठी वेडी झाली होती आणि पाँटिंगचा प्रस्ताव (प्रपोजल) मान्य केला. अशाप्रकारे दोघांची लव लाईफची रंजक सुरुवात झाली होती. त्यानंतर हळू-हळू त्यांच्यातील प्रेम वाढू लागले. जेनिफर पाँटिंगबरोबर क्रिकेट दौऱ्यावरही जाऊ लागली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. त्यानंतर २००२मध्ये या दोघांनीही लग्न केले आणि कायमचे एकत्र आले.
https://www.instagram.com/p/B85RaydBiCS/?utm_source=ig_web_copy_link
आज जेनिफर आणि पाँटिंग ३ मुलांचे आई-वडील आहेत. तसेच दोघेही आपल्या कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवत आहेत. पाँटिंग आजही आपल्या बायकोवर खूप प्रेम करतो. अनेकवेळा त्याने आपल्या मुलाखतीत आपल्या यशाचे श्रेय आपल्या पत्नीला दिले आहे.
पाँटिंग ऑस्ट्रेलियाकडून खेळताना एकूण १६८ कसोटी सामने, ३७५ वनडे सामने आणि १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५१.८५ च्या सरासरीने १३,३७८ धावा, वनडेत ४२.०३ च्या सरासरीने १३७०४ धावा आणि टी२०त २८.६४ च्या सरासरीने ४०१ धावा केल्या आहेत.
त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७१ शतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
एकूण खेळाडू २०४ आणि करोडोंची खैरात! असा राहिला आयपीएलचा मेगा ऑक्शन
चमिका करुणारत्नेला केकेआरने दिला आश्रय; लावली ‘इतक्या’ लाखांची बोली
घरी पाहुण्यांची, तर बाहेर गाड्यांची गर्दी; तरीही चेअरमनच्या एका कॉलवर चारू शर्मांची लिलावासाठी हजेरी