आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने विलगीकरणात होते. वरुण चक्रवर्तीला खांद्याच्या दुखापतीसाठी बायो बबल मधून बाहेर पडून हॉस्पिटल मध्ये स्कॅन करण्यासाठी जावे लागले होते. याच दरम्यान त्याला संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्या संपर्कामुळे संदीप वॉरियरला देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता.
यानंतर हे दोन्ही खेळाडू विलगीकरणात राहत होते. मात्र आता त्यांचे दहा दिवसांचे विलगीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडू आपल्याला घरी परतले असल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयच्या एक सूत्राने याबाबतची माहिती दिली.
तामिळनाडूचा असलेला वरुण चक्रवर्ती त्याच्या घराकडे रवाना झाला आहे. तर केरळचा संदीप वॉरियर देखील आपल्या घरी जाण्यासाठी रवाना झाला आहे. या वृत्ताची पुष्टी एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केली. मात्र त्यासह कोलकाता नाईट रायडर्सचे व्यवस्थापन या दोघांच्या आरोग्यावर बारकाईने नजर ठेवून आहेत, अशीही माहिती या अधिकाऱ्याने दिली. या दोन्ही खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी अनुक्रमे तामिळनाडू आणि केरळ मध्येच करण्यात येईल.
संक्रमण पसरल्याने आयपीएल झाले स्थगित
दरम्यान, वरुण चक्रवर्ती पासून सुरू झालेली ही संक्रमणाची साखळी वाढतच गेल्याने बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केले होते. सर्वप्रथम वरुण चक्रवर्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर संदीप वॉरियर आणि प्रसिद्ध कृष्णा या कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाली होती. तर संदीपच्या संपर्कात आल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राला देखील कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. अखेर हे वाढते संक्रमण पाहून बीसीसीआयने आयपीएलचा यंदाचा हंगाम अर्ध्यातच स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता या हंगामाचे उर्वरित सामने दुसर्या देशात इतर कुठल्या कालावधीत खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल स्थगित होणे या संघांना ठरणार फायदेशीर? ४ दिग्गज दुखापतीतून सावरुन करु शकतात पुनरागमन
लग्नाच्या आधीच ‘या’ क्रिकेटपटूंना झाली होती मुलं, एक आहे मास्टर ब्लास्टरचा खास मित्र