सध्या भारतीय क्रिकेट संघ युएई येथे टी२० विश्वचषक खेळत आहे. स्कॉटलंड विरूद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती याने एक मुलाखत दिली. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरे देताना दिसला. त्याने या मुलाखतीत भारताच्या खेळाडूंची तुलना युएईमधील प्रसिद्ध इमारतींशी केली.
विविध इमारतींशी केली तुलना
आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऍंकरने वरूणला प्रश्न विचारला, “तू आर्किटेक आहेस का?” त्यावर त्याने हो उत्तर दिले. त्यानंतर, ऍंकरने वरूणला युएईतील विविध जगप्रसिद्ध इमारतींची छायाचित्रे दाखवत त्यांची तुलना भारतीय संघातील खेळाडूंशी करण्यास सांगितले. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या दुबई येथील बुर्ज खलिफा इमारतीची तुलना त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीशी केली. सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू हाच त्यासाठी पात्र असल्याचे त्याने स्पष्टीकरण दिले.
धोनीची तुलना या इमारतीशी
वरूण याने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी व संघाचा सध्याचा मेंटर एमएस धोनीची तुलना बुर्ज अल अरबशी केली. ही इमारत ज्याप्रकारे समुद्रात शांतपणे उभी आहे अशाच प्रकारे धोनी शांत असतो, असे त्याने स्पष्टीकरण दिले. याशिवाय भारताचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या हा अटलांटिस इमारतीप्रमाणे चमकदार आणि स्टायलिश असल्याचे त्याने म्हटले.
तीन सामन्यात एकही बळी मिळवू शकला नाही वरूण
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात मिस्ट्री स्पिनर म्हणून वरूणला संधी देण्यात आली होती. आयपीएल २०२१ उत्तरार्धात शानदार गोलंदाजी केल्यामुळे तो विश्वचषकात प्रभाव पाडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याने आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये तीन सामने खेळले असून, यामध्ये तो एकही बळी मिळवण्यात यशस्वी ठरला नाही. मात्र, या सर्व सामन्यात त्याला धावा रोखण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या-
जमलं बरं का! राहुलने स्विकारले आथियासोबतचे नाते; होणार सुनील शेट्टीचा जावई
मोठी बातमी: भारताला तब्बल १३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देणारे प्रशिक्षक तारक सिन्हा कालवश
अरेरे! सलग तीन गडी बाद होऊनही पूर्ण झाली नाही शानदार शमीची हॅट्रिक






