भारतीय संघ शनिवारी (१३ ऑगस्ट) झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाला. शिखर धवन या दौऱ्यात संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडीज दौऱ्यातही धवनने जबरदस्त प्रदर्शन केले होते. आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ रवाना होत असताना त्यांची भेट बॉलिवुड अभिनेता वरुण धवन आणि त्यांची पत्नी नताशा यांच्याशी झाली. वरुणने स्वतः हे फोटो शेअर केले आहेत.
वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची पत्नी नताशा (Natasha) यांची भारतीय क्रिकेटपटूंशी भेट झाली. वरुणने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टमध्ये दोन फोटो आहेत. पहिल्या फोटोत शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि वरुण एकत्र दिसतात. तर दुसऱ्या फोटोत भारतीय संघ आहे, ज्यांच्यासोबत वरुण आणि त्यांची पत्नी दोघांनी पोज दिली आहे.
सोशल मीडिया पोस्टच्या कॅप्शनमध्ये वरुणने लिहिले की, “सकाळी ४ वाजता मी एका कॅन्डीच्या दुकानातील मुलाप्रमाणे होतो. भारतीय क्रिकेट संघला भेटल्याने आणि त्यांच्या आगामी दौऱ्याविषयी चर्चा केल्यानंतर खूप उत्साहित आहे. त्याचसोबत शिखर धवनने माझ्याकडून काही कोडी सोडवून घेतली.” वरुणच्या म्हणण्याचा अर्थ असा असू शकतो की, भारतीय खेळाडूला काही प्रश्न होते, ज्याचे उत्तर त्याला मिळाले आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी वरुणचा ‘जुग जुक जिओ’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
At 4 in the morning I was like a boy in a candy shop. Got very excited to meet and chat with our men in blue
About their upcoming tour. Also @SDhawan25 asked me a couple of riddles 😂 pic.twitter.com/DbknESJB0k— VarunDhawan (@Varun_dvn) August 13, 2022
शिखर धवन या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाच्या उपकर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. निवडकर्त्यांनी धवनला या दौऱ्यासाठी कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली होती, पण केएल राहुल संघात परतल्यानंतर त्याला कर्णधार बनवले गेले आणि धवन उपकर्णधार बनला. असे असले तरी, संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयानंतर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. तत्पूर्वी वेस्ट इंडीज दौऱ्यात धवन भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याने यजमान वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ०-३ असा क्लीन स्वीप दिला होता.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
केएल राहुल (कप्तान) शिखर धवन (उपकप्तान), रुतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर , कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहितसोबतच्या दोस्तीवर बोलताना शिखर म्हणतो, “तो माझा…”
पाकिस्तानी खेळाडूही देऊ लागले विराटला सल्ले; हा दिग्गज म्हणतोय, “त्याला स्वतःला…”
राहुलला लगेच कर्णधार बनवण्याची गरज नव्हती, धवनला मिळणाऱ्या वागणुकीमुळे माजी निवडकर्ते नाराज