---Advertisement---

टीम इंडियातील स्थान परत मिळवण्यासाठी कंबर कसून मेहनत घेतोय अय्यर, शेअर केलाय व्हिडिओ

On: मंगळवार, जुलै 26, 2022 9:59 PM
Venkatesh-Iyer-Video
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगने भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखवण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला आहे. क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवत भारतीय संंघात जागा मिळवल्याची बरीच उदाहरणे आहे. अष्टपैलू वेंकटेश अय्यर यानेदेखील त्याच्या आयपीएल २०२१मधील प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात जागा मिळवली होती. परंतु राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्त्व करताना त्याचे प्रदर्शन वाईट राहिले, ज्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आले आहे.

मात्र काही सामन्यांनंतर संघाबाहेर केल्याने निराश न होता वेंकटेश (Venkatesh Iyer) त्याच्या प्रदर्शनावर मेहनत घेण्यात व्यस्त आहे. स्वत: वेंकटेशने आपल्या सरावाचा (Venkatesh Iyer Practice) व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

आयपीएलमधील अष्टपैलू प्रदर्शनामुळे मिळाली होती संधी
वेंकटेशने आयपीएल २०२१ मध्ये अर्थातच त्याच्या पदार्पणाच्या हंगामात उल्लेखनीय प्रदर्शन केले होते. त्याला या हंगामातील पहिल्या टप्प्यात तर संधी मिळाली नव्हती. मात्र दुसऱ्या टप्प्यात तो कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यात यशस्वी झाला आणि आपल्या प्रदर्शनाने कहर माजवला होता. या हंगामात १० सामने खेळताना त्याने ४१.११ च्या सरासरीने ३७० धावा केल्या होत्या.

तसेच गोलंदाजीत संघाला ३ विकेट्सही मिळवून दिल्या होत्या. त्याच्या योगदानामुळे कोलकाताचा संघ या हंगामात उपविजेतेपदापर्यंतचा प्रवास करू शकला होता.

https://www.instagram.com/reel/CgcOtlgADda/?utm_source=ig_web_copy_link

त्याच्या याच प्रदर्शनानंतर त्याला भारतीय संघाच प्रवेश मिळाला. त्याच्या सरासरी प्रदर्शनानंतरही भारताच्या संघ व्यवस्थापनाने त्याला संधी दिल्या. तो भारतीय संघाकडून २ वनडे आणि ९ टी२० सामने खेळला. २ वनडे सामन्यांमध्ये त्याने फक्त २४ धावा काढल्या. तर ९ टी२० सामन्यांमध्ये त्याला १३३ धावा करता आल्या.

अखेर अष्टपैलू हार्दिक पंड्याचे संघात पुनरागमन झाले आणि वेंकटेशचा भारतीय संघातून पत्ता कटला. आता हार्दिकने दुखापतीतून बरे झाल्यानंतर आपला जुना फॉर्म दाखवला आहे. त्यामुळे वेंकटेशचे पुन्हा भारतीय संघात पुनरागमन होणे जवळपास कठीण आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

कार्तिकच्या नावाची चाहत्यांकडून नारेबाजी, फिल्डिंग करत असलेल्या मुरली विजयने थेट जोडले हात

टीम इंडियाला मिळाला आणखी एक नवा कोच! टी२० वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने कसली कंबर

Kargil Vijay Diwas| इरफान ते पुजारा, भारतीय क्रिकेटर्सनी कारगिल युद्धाच्या नायकांना वाहिली श्रद्धांजली 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---