---Advertisement---

‘पृथ्वीला दुसरी संधी द्या!’, दिग्गज गोलंदाजाची थेट ट्विट करून मागणी

On: शुक्रवार, जानेवारी 13, 2023 5:19 PM
---Advertisement---

रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये मुंबईसाठी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने ऐतिहासिक खेळी केली आहे. त्याने या स्पर्धेत बुधवारी (11 जानेवारी) आसाम विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने ही तुफानी शतकी खेळी केली. 379 धावांच्या या विक्रमी खेळीनंतर पृथ्वीला पुन्हा एकदा भारतीय संघात संधी देण्याची मागणी अनेक माजी क्रिकेटपटू करत आहेत.

रणजी ट्रॉफी 2022-2023 च्या एलिट बी गटातील मुंबई विरुद्ध आसाम या सामन्यात मुंबईने पहिल्या दोन दिवसांवर वर्चस्व गाजवले. पृथ्वी शॉने एक हाती जबाबदारी घेत पहिल्या दिवशी नाबाद द्विशतक झळकावलेले. दुसऱ्या दिवशी त्याने आपली खेळी अशीच पुढे नेत कारकिर्दीतील पहिल्या त्रिशतकाला गवसनणी घातली. रियान परागने त्याला बाद केले. बाद होण्यापूर्वी त्याने 383 चेंडूंमध्ये 379 धावांची खेळी केली. यामध्ये 49 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. रणजी ट्रॉफी इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च खेळी ठरली.

 

त्याच्या याच शानदार खेळीनंतर भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विट करत त्याला दुसरी संधी मिळायला हवी अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनी लिहिले,

“पृथ्वी हा एक स्पेशल आणि वेगळा खेळाडू आहे. त्याला कोणत्याही कारणाने संघातून बाहेर ठेवले असले तरी, त्याच्या खेळाने त्याने दुसरी संधी निर्माण केली आहे. त्याला संघात स्थान देऊन त्याच्याशी योग्य बातचीत व्हायला हवी. हे त्याच्यासाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी फायद्याचे आहे.”

पृथ्वीने भारतासाठी आत्तापर्यंत 5 कसोटी, 6 वनडे व‌ 1 टी20 सामना खेळला आहे. 2021 मध्ये त्याने भारतासाठी अखेरच्या वेळी मैदानावर पाऊल ठेवलेले. सध्या तो देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये खोऱ्याने धावा काढताना दिसतोय.

(Venkatesh Prasad Said Prithvi Shaw Deserve Second Chance)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट आणि ईशानच्या डान्सने दणाणून सोडले ईडन गार्डन्स, बेधुंद होऊन नाचतानाचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल
राहुल द्रविडने सोडली टीम इंडिया! तब्येतीच्या समस्येमुळे एकटाच बंगळुरूला रवाना, तिसऱ्या वनडेसाठी…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---