वेंकटेश प्रसाद हा एक असा चेहरा आहे, जो सतत चाहत्यांना विश्वचषकातील पाकिस्तानच्या दारुण पराभवाची आठवण करुन देतो. भारताचे माजी वेगवान गोलंदाज प्रसाद हे निवृत्तीनंतरही वेगवेगळ्या निमित्ताने क्रिकेटशी जुळून राहिले. सुरुवातीला ते भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. तर, गेल्या अनेक वर्षांपासून ते क्रिकेट तज्ञाची भूमिका पार पाडत आहेत.
अशात प्रसाद यांनी भारताचा माजी यशस्वी कर्णधार सौरव गांगुली आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्यातील नेतृत्त्वाबद्दलच्या समानतेंविषयी आपले मत मांडले आहे. प्रसाद यांना वाटते की, गांगुली आणि विराट यांचे नेतृत्त्व करण्याची पद्धत सारखी आहे. परंतु, त्यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे आक्रमकता. विराट हा नेहमी मैदानावर आक्रमक दिसून येतो, तर गांगुलीची आक्रमकता कधी तरी पाहायला मिळायची.
प्रसाद म्हणाले, “गांगुली आणि विराटमध्ये बऱ्याच समानता आहेत. कारण, गांगुलीने त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते, जेव्हा संघात खूप नकारात्मक गोष्टी चालू होत्या. गांगुलीने संघात खूप बदल घडवून आणले. मला वाटते की, त्यावेळी संघाला प्रभावशाली नेतृत्त्व कौशल्याची गरज होती आणि गांगुलीने तेच केले. त्याच्याजवळ अदभुत नेतृत्त्व क्षमता होती आणि त्याने कर्णधार आणि खेळाडू या दोन्ही रुपात उल्लेखनीय कामगिरी केली होती.”
प्रसाद पुढे बोलताना म्हणाले, “तरीही गांगुलीची फिटनेस, त्याचे क्षेत्ररक्षण यामध्ये काही कमतरता होत्या. पण ठीक आहे. कमतरता कुणामध्ये नसते? परंतु, त्या स्तरावर त्याचे नेतृत्त्व कौशल्य महत्त्वाचे होते आणि त्याने सर्वांना दाखवून दिले की एक उत्कृष्ट कर्णधार काय करु शकतो.”
कोहलीविषयी बोलताना प्रसाद म्हणाले की, “अनेक माजी खेळाडू म्हणतात की, विराट मैदानावर बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त आक्रमक होत असायचा. पण मला वाटते की, विराटने मैदानावर कधीही आपल्या वागणूकिची सीमारेषा ओलांडली नाही. तो आक्रमकतेमध्ये गांगुलीच्या खूप पुढे होता. गांगुली खूप कमीवेळा त्याच्या भावनांना जाहीर करत असायचा. पण, विराट हा खूप भावनिक आणि उत्साही आहे. पण तो मैदानावर आवश्यक असेल तेवढाच आक्रमकपणा दाखवतो.”
“लोकांना वाटते की विराटला स्वत:ला संयमात ठेवता येत नाही. पण, विराटची आक्रमकताच त्याला खेळात टिकून ठेवते,”असेही पुढे बोलताना प्रसाद यांनी सांगितले.
ट्रेंडिंग घडामोडी-
नो बाॅल तर आहेच, पण आता वाईड बॉलवरही मिळणार फ्री हीट
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी बॅड न्यूज, या देशाचा टीम इंडियाचा दौरा…
काय सांगता! थेट ‘स्टेनगन’ डेल स्टेनच्या घरी चोरट्यांचा…