आशिया चषकात भारतताला आपला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना सुपर फेरीतील शेवटचा सामना असेल, जो 15 सप्टेंबर म्हणजेच शुक्रवारी खेळवला जाईल . बांगलादेशसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. पण त्याआधीच त्यांचा संघ दुपळा पडताना दिसत आहे. बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुश्तफिकूर रहीम भारताविरुद्ध खेळू शकणार नाही.
मुस्तफिकूर रहीम () भारताविरुद्धच्या सामन्यात वैयक्तिक कारणास्तव खेळू शकणार नाही, अशा बातम्या मागच्या काही दिवसांपासून समोर येत होते. अशातच बुधवारी (13 सप्टेंबर) तो या सामन्यात खेळणार नाही, अशी अधिकृत माहिती समोर येत आहे. मुश्तफिकूर दुसऱ्यांदा वडील होणार असल्यामुळे बांगलादेश संघाने त्याला मायदेशात परतण्याची परवानगी दिली आहे. सोशल मीडियावर मुस्तफिकूर रहीम आणि त्याच्या कुटुंबाचे एकत्र फोटोही समोर आले आहेत. मुस्तफिकूरनेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून त्याला मुलगी झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
मुस्तफिकूर रहीम बांगलादेशच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक राहिला आहे. त्याने आतापर्यंत 86 कसोटी, 255 वनडे आणि 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान यष्टीरक्षक फलंदाजाने आतापर्यंत 14441 धावा केल्या आहेत. सोबतच 374 झेल आणि 100 खेळाडूंना यष्टीचीत केले आहे. 2005 साली बांगलादेशसाठी पदार्पण केले हा क्रिकेटपटू आजही संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. भारताविरुद्ध त्याची कमी संघाला जानवू शकते. संघाकडून मुस्तफिकूरच्या जागी कोणता खेळाडू यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडणार, हे अद्याप स्पष्ट केले गेले नाहीये. (Veteran to miss the match against India due to the birth of his child.)
आशिया चषकासाठी निवडलेला बांगलादेश संघ –
शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झिद तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शेख महेदी, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफिफ हुसेन, शोरिफूल इस्लाम. , इबादत हुसेन, नईम शेख.
राखीव –तैजूल इस्लाम, सैफ हसन, तनझिम हसन साकिब.
महत्वाच्या बातम्या –
प्रेक्षकांच्या हाणामारीने भारत-श्रीलंका सामन्याला गालबोट! स्टेडिअममध्येच भिडले फॅन्स; व्हिडिओ तुफान व्हायरल
‘हा विजय माझ्यासाठी पाकिस्तानपेक्षाही मोठा…’, श्रीलंकेच्या नांग्या ठेचल्यानंतर असे का म्हणाला गंभीर?