श्रीलंकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर (Sri Lanka Tour On India) असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) सुरू आहे. ही कसोटी मालिका आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचा भाग असून उभय संघ ही मालिका जिंकत त्यांची गुणतालिकेतील स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यजमान भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना तिसऱ्याच दिवशी १ डाव आणि २२२ धावांनी जिंकला आहे.
त्यामुळे मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाची नजर आगामी दुसऱ्या कसोटी सामन्यावर आहे. हा सामना १२ ते १६ मार्चदरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवस-रात्र स्वरुपात (Day-Night Test) खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवसआधी (११ मार्च) भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह (Vice Captain Jasprit Bumrah) याने पत्रकार परिषदेत (Bumrah Press Conference) संघाच्या रणनितीची खुलासा केला आहे.
- गुलाबी चेंडू कसोटीबद्दल जसप्रीत बुमराह म्हणाला…
पत्रकार परिषदेत सर्वप्रथम बुमराहला आव्हानात्मक गुलाबी चेंडू कसोटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल बोलताना बुमराह म्हणाला की, “आम्ही जास्त गुलाबी चेंडू कसोटी सामने खेळलेले नाहीत, त्यामुळे आम्हाला अशा सामन्यांचा जास्त अनुभव नाही. आता बऱ्याच कालावधीनंतर आम्ही दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहोत. त्यासाठी आम्ही लाईट्सचा वापर करून सराव करत आहोत.”
“मोहाली कसोटीनंतर आमचे एक पर्यायी सराव सत्र झाले आणि या सराव सत्रात आम्ही गुलाबी चेंडूने पुन्हा पुन्हा सराव केला. आम्ही जरी जास्त दिवस रात्र कसोटी सामने खेळले नसतील, तरीही आम्हाला मानसिकरित्या स्वत:ला त्यासाठी तयार करावे लागणार आहे. हा व्यावसायिक क्रिकेटचा भाग आहे आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. आम्ही नेट्समध्ये लाईटमध्ये खेळत आहोत, गुलाबी चेंडूचा वापर करून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत आहोत. लाल चेंडूला सकाळी स्विंग मिळतो, तर गुलाबी चेंडूला संध्याकाळी, अशा बारिकसारिक गोष्टींवर आम्ही तयारी करतोय. तसेच गुलाबी चेंडू कसोटीदरम्यान झेल टिपणे आव्हानात्मक असते, त्यावर आमचे काम सुरू आहे,” असेही बुमराहने पुढे सांगितले.
गुलाबी चेंडू कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाल, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने विरोधी गोलंदाजाला मारली बॅट, कॅमेरात कैद झाली होती पूर्ण घटना
अखेर दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नचे पार्थिव मेलबर्नमध्ये दाखल, मार्चअंती होणार अनंतात विलिन
आयपीएल इतिहासात प्रथमच असणार ऑरेंज कॅप-पर्पल कॅपसाठी स्पॉन्सर! ‘या’ कंपनीशी झाला करार