आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारतीय संघासाठी गुरुवार (दि. 05 ऑक्टोबर) हा दिवस खास ठरला. ज्योति सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि परनीत कौर यांच्या महिला तिरंदाजी संघाने भारताला 19वे सुवर्ण पदक जिंकून दिले. महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने अंतिम सामन्यात तैवानला 230-228 अशा फरकाने पराभूत केले. एशियन गेम्स 2023 मधील हे भारताचे एकूण 82वे पदक आहे.
यापूर्वी उपांत्य सामन्यात भारताच्या या त्रिकुटाने इंडोनेशियाला 233-219ने, तर उपांत्यपूर्व सामन्यात हाँगकाँगला 231-220ने पराभूत केले होते. या स्पर्धेत आतापर्यंत भारताने 19 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्य पदक आपल्या नावावर केले आहेत.
अंतिम सामन्याविषयी
महिला कंपाऊंड तिरंदाजी (Compound Archery) खेळात पहिल्या राऊंडनंतर भारतीय त्रिकुट 56-54ने पिछाडीवर होते. दुसऱ्या राऊंडनंतर ज्योति सुरेखा वेन्नम (Jyothi Surekha Vennam), आदिती स्वामी (Aditi Swami) आणि परनीत कौर (Parneet Kaur) यांनी दमदार पुनरागमन केले. त्यानंतर एकूण स्कोर 112-111 झाला. तिसऱ्या राऊंडमध्ये तैवानच्या खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले आणि स्कोर 171-171ने बरोबरीत सुटला. चौथ्या राऊंडमध्ये भारतीय त्रिकुटाने चांगला स्कोर करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केला. अंतिम 3 शॉटमध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 30 स्कोर केला.
The moment India won Gold Medal in Women's Compound Archery.
19th🏅in Asian Games…!! 🇮🇳pic.twitter.com/dfVjDhmWM6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 5, 2023
सिंधूचा पराभव
दुसरीकडे, 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाली. तिला चीनच्या बिंगजियाओविरुद्धच्या सामन्यात सरळ सेटमध्ये पराभव पत्करून आशियाई क्रीडा स्पर्धांमधून (Asian Games 2023) बाहेर पडावे लागले. जगातील 15व्या मानांकित सिंधूला जगातील पाचव्या मानांकित बिंगजियाओ हिच्याविरुद्ध 47 मिनिटे चाललेल्या खेळात 16-21, 12-21ने पराभव पत्करावा लागला. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये बिंगजियाओ हिला सरळ सेटमध्ये पराभूत करत कांस्य पदक जिंकले होते. मात्र, चीनच्या खेळाडूने एशियन गेम्समध्ये सिंधूला पराभूत केले.
सिंधूने 2014 इंचियोन आणि 2018 जकार्ता एशियन गेम्समध्ये अनुक्रमे कांस्य आणि रौप्य पदक जिंकले होते. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात केली होती. मात्र, बिंगजियाओ हिने लवकर 9-5ची आघाडी घेतली. सिंधूला कोर्टमध्ये हालचाल करण्याबाबत संघर्ष करावा लागला. बिंगजियाओने भारतीय खेळाडूला संपूर्ण कोर्टमध्ये धावण्यासाठी भाग पाडले आणि योग्य शॉट मारत गुण मिळवले. चीनची खेळाडू पहिला सेट 23 मिनिटात जिंकली. तसेच, दुसऱ्या सेटमध्येही सिंधू संघर्ष करताना दिसली. बिंगजियाओने 5-1ने आघाडी घेतली. मात्र, सिंधूने पुनरागमन करत 8-9 असा स्कोर केला. मात्र, बिंगजियाओने सलग 3 गुण मिळवत 12-8ची आघाडी घेतली. त्यानंतर तिला सामना जिंकण्यात कोणतीही अडचण आली नाही. (victory in asian games 2023 jyothi surekha vennam aditi swami and parneet kaur won gold medal in archery compound womens team)
हेही वाचा-
Asian Games 2023 । नीरज चोप्रानंतर पुरुषांच्या 4×400 मीटर रिले संघाने भारतासाठी जिंकेल सुवर्ण पदक
Asian Games 2023 । चॅम्पियन नीरजने पुन्हा जिंकले सुवर्ण, भालाफेक स्पर्धेचे रौप्य पदकही भारताकडेच