क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे अनेक सामने आहेत जे फिल्डिंगमुळे त्याचे चित्र बदललेले आपण पाहिले आहे. याबरोबरच, भारतीय संघामध्ये असे काही खेळाडू आहेत जे त्यांच्या फिल्डिंगसाठी ओळखले जातात. सध्या एका वयस्कर खेळाडूने जबरदस्त फिल्डिंगचा नमूना सादर केलेला पहायला मिळाला आहे.
याबरोबरच, हे कॅच बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या लिग मधील एलिमिनेटर सामन्यांमध्ये इम्रान ताहिर याने पार्ल रॉयल्स संघाविरूद्धच्या सामन्यात घेतले आहेत. तसेच त्याने दोन विकेट आणि दोन कॅच देखील पकडले आहेत. यामध्ये इम्रान ताहिर याने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
Imran Tahir is unbelievable. #BetwaySA20 pic.twitter.com/4ZSJ2ANavM
— Anurag Goyal (@Cricketforver) February 8, 2024
एलिमिनेटर सामन्यामध्ये पार्ल रॉयल्स संघााची बॅटींग सुरू असताना जोहान्सबर्ग सुपर किंग्जचा गोलंदाज नांद्रे बर्गर याच्या गोलंदाजीने तिसऱ्या बॉलवर डॅन विलासने मोठा फटका खेळला होता. त्यावेळी फिल्डिंग करत असलेल्या इम्रान ताहिर याने धावत येत शानदार झेल पकडला आहे. यावरती 44 वर्षाच्या ताहिरने इतक्या चपळाईने झेल पकडला यावर कोणालाच विश्वास बसत नव्हता.
दरम्यान, बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यामध्ये टॉस जिंकत फाफ डू प्लेसिसने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पार्ल रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 138 धावा केल्या होत्या.तर जॉबर्ग सुपर किंग्सकडून कॅप्टन फाफ डू प्लेसिस आणि एल डू प्लॉय यांच्या अर्धशतकी खेळी करत एलिमिनेटर सामना 9 विकेटने जिंकला आहे.
जॉबर्ग सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) :- फाफ डू प्लेसिस (C), लेउस डू प्लॉय, रीझा हेंड्रिक्स, सिबोनेलो मखान्या, मोईन अली, डोनोव्हन फरेरा (W), डग ब्रेसवेल, दयान गॅलीम, सॅम कुक, नांद्रे बर्गर, इम्रान ताहिर.
पारल रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) :- जेसन रॉय, जोस बटलर (डब्ल्यू), मिचेल व्हॅन बुरेन, डेव्हिड मिलर (C), डेन विलास, विहान लुब्बे, अँडिले फेहलुक्वायो, ब्योर्न फॉर्च्युइन, कोडी युसूफ, ओबेद मॅककॉय, तबरेझ शम्सी.
महत्वाच्या बातम्या –
विराट दुसऱ्यांदा वडील बनणार आहे? डिविलियर्सचा आपल्या विधानावरून यू-टर्न, वाचा काय म्हणाला…
U19 World Cup Final: ठरलं! वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पुन्हां एकदा भारत ऑस्ट्रलिया वर्ल्डकप फायनल सामना…
वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’