क्रिकेट वा फुटबॉल खेळ कोणताही असो खेळाडूने यश संपादन केलं की त्यानंतरच सेलिब्रेशन पाहण्यासारखं असतं. आजवर अनेक खेळाडू त्यांच्या सेलिब्रेशन स्टाईलमुळे जगभरात प्रसिद्ध झाले. तर दुसरीकडे मोठा चाहतावर्ग असणाऱ्या खेळाडूने साधंस जरी सेलिब्रेशन केलं तर इतर लोकं त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. असंच काहीसं केलंय दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू एमरान ताहिर याने. त्याने थेट फुटबॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ‘सीयू’ सेलिब्रेशनची नक्कल केली.
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरने ‘वय फक्त एक आकडा आहे’ ही गोष्ट पटवून दिली आहे. आफ्रिकन फिरकीपटूने त्याच्या शानदार क्रिकेट कारकिर्दीत आधीच बरेच काही साध्य केले आहे, परंतु प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा त्याचा उत्साह अजूनही कायम आहे. त्याचे विकेट घेतल्यानंतरचे सेलिब्रेशन नेहमीच चर्चेत असते. आता इंग्लंडच्या द हंड्रेड स्पर्धेत विकेट घेतल्यानंतर त्याने असा सेलिब्रेशन केला जो चर्चेचा विषय बनला आहे. त्याचे सेलिब्रेशन सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Imran Tahir celebrations are the best celebrations 😍#TheHundred | @ImranTahirSA pic.twitter.com/kzRliukvgd
— The Hundred (@thehundred) August 15, 2022
रोनाल्डोच्या ‘सीयू’ सेलिब्रेशनची कॉपी करण्यात आली
द हंड्रेड स्पर्धेत बर्मिंगहॅम फिनिक्सकडून खेळताना त्याने डेव्हिड मलानला ट्रेंट रॉकेट्सविरुद्ध आपल्या जाळ्यात पकडले. इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानला गुगली चेंडूवर इम्रानने बाद केला. त्यानंतर त्यांनी एक तडफदार सेलिब्रेशन साजर केलं. विकेट घेतल्यानंतर तो मैदानावर धावला आणि शेवटी रोनाल्डोच्या सीयू सेलिब्रेशनसह करत त्यानी सर्वांना मनमोहित केलं.
बर्मिंगहॅम फिनिक्सने ट्रेंट रॉकटेजचा पराभव केला
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बर्मिंगहॅम फिनिक्स संघाने ट्रेंट रॉकेट्सचा ७ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ट्रेंट रॉकेट संघाने १०० चेंडूत १४५ धावा केल्या. ट्रेंट रॉकेट्सकडून डॅनियल सॅम्सने २५ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. दुसरीकडे, बर्मिंगहॅम फिनिक्सकडून बेनी हॉवेलने २८ धावांत ३ आणि ताहिरने २६ धावांत १ बळी घेतला. लक्ष्याचा पाठलाग करताना बर्मिंगहॅमने १४ चेंडू राखून लक्ष्य गाठले. बर्मिंगहॅमकडून मोईन अली आणि लिव्हिंगस्टोन यांनी अर्धशतकी खेळी खेळली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मालिकेआधीच शिखर धववने गायले झिम्बाब्वेच्या ‘त्या’ फलंदाजाचे गोडवे! गोलंदाजांनाही केले सावध
‘रोहितची कॅप्टन्सी सेम टू सेम धोनीसारखीचं!’ भारताच्या माजी दिग्गजानं केलाय दावा
‘बाबरचे वादळ रोखणं होतंय कठीण!’ मागील ८ पैकी ७ सामन्यात झळकावलंय अर्धशतक, वाचा रेकॉर्ड्स