---Advertisement---

AUS vs WI । आंद्रे रसल नाही पेलू शकला स्पेंसर जॉन्सनचा बाऊंसर, चेंडू लागल्यानंतर फलंदाज जमीनधोस्त

Viral Video
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना मंगळवारी (13 फेब्रुवारी) पर्थमध्ये खेळला गेला. वेस्ट इंडीज संघ पहिल्या 10 षटकांमध्ये अडचणीत दिसत होता. पण सेवटच्या 10 षटकात आंद्रे रसल आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी तुफान फटकेबाजी केली. परिणामी वेस्ट इंडीज संघ 200+ धावा करू शकला. पण यादरम्यान आंद्रे रसल याला एक बाऊंसर चेंडू महागात पडू शकत होता. सुदैवाने या चेंडूवर अष्टपैलूला कोणती गंभीर दुखापत झाली नाही.

वेस्ट इंडीजचा धडाकेबाज अष्टपैलू आंद्रे रसल (Andre Russell) याने मालिकेतील या तिसऱ्या सामन्यात धावांचा पाऊस पाडला. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी जोरदार कुटाई केली. मंगळवारी पर्थवर अवघ्या 29 चेंडूत 71 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 7 षटकारांचा समावले होत्या. रसलच्या शानदार खेळीसह एक घातक बाऊंसर देखील चर्चेत राहिला. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेंसर जॉन्सर (Spencer Johnson) याने हा चेंडू टाकला होता. चेंडू लागल्यानंतर रसल गडबडून जमिनीवर खाली पडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडीजच्या डावातील 10व्या षटकात स्पेंसर जॉन्सर गोलंदाजीला आला. षटकातील पहिला चेंडूत त्याने खेळपट्टीवर आपडला, जो थेड आंद्रे रसलच्या चेहऱ्याकडे आला. सुदैवाने चेंडू रसलच्या चेहऱ्यावर न लागता हातातील ग्लव्जला लागला. चेंडू लागल्यानंतर रसल खाली पडला. एका क्षणासाठी असे वाटते की, चेंडू फलंदाजाला जोरात लागला असून तो जखमी झाला आहे. पण दुसऱ्याच क्षणी रसल उभा राहतो. हातातील ग्लव्ज काढून तो एकदा दुखापत झाली नाही, याची खात्री करताना दिसत आहे. जॉन्सनने या बाऊंसरनंतर षटकातील पुढचे काही चेंडू शॉर्ट लेंथ टाकले. पण रसलने यावर मोठे शॉट्स खेळत धावा लुटल्या.

उभय संघांतील या सामन्याची नामेफेक पाहुण्या वेस्ट इंडीजने जिंकली. नाणेफेक गमावल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाला प्रथम गोलंदाजी कारावी लागली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 20 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 220 धावांपर्यंत मजल मारली. शेरफेन रदरफोर्ड याने 40 चेंडूत 67* धावा केल्या, तर रसलने अवघ्या 29 चेंडूत 71 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान रसलचा स्ट्राईक रेट 244.82 इतका होता. या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 139 धावांची भागीदारी झाली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाव्या विकेटसाठी झालेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. (video andre russell falls on the ground while playing spencer johnson bouncer in 3rd t20i against australia )

महत्वाच्या बातम्या – 
बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये! आता रणजी ट्रॉफीला पर्याय नाही, ईशानसह इतर काही खेळाडूंना केल्या सुचना
Dattajirao Gaekwad । भारताच्या सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ‘या’ वर्षी घेतला जगाचा निरोप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---