क्रिकेटमध्ये सामन्यादरम्यान खेळाडूंमधील वातावरण तापल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. आयपीएल 2023 हंगामात असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या विजयात सिंहाचा वाटा उचला. त्याने 4 षटकात 22 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जडेजाने आयपीएल 2023 हंगामात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. सामन्यादरम्यान असे काही घडले की, जेव्हा जडेजा हैदराबादच्या हेन्रीच क्लासेन या फलंदाजावर संतापला. यादरम्यान व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात दिसते की, जडेजाला शांत करण्यासाठी कर्णधार एमएस धोनी याला मध्यस्थी करावी लागली.
रवींद्र जडेजा आणि हेन्रीच क्लासेन (Ravindra Jadeja And Heinrich Klaasen) यांच्यातील ही घटना हैदराबाद संघाच्या डावातील 14व्या षटकात घडली. झाले असे की, षटकातील पहिल्या चेंडूवर जडेजाकडे मयंक अगरवाल याला बाद करण्याची संधी होती. जडेजाचा फुल लेंथ चेंडू मयंकने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटला लागला नाही आणि थेट जडेजाकडे गेला. जडेजा झेल घेण्यापूर्वीच दुसऱ्या बाजूला उभा असणारा फलंदाज क्लासेन त्याच्या मध्ये आला. यावेळी दोघांमध्ये टक्कर झाली आणि झेल सुटला.
https://twitter.com/BilluPinkiSabu/status/1649602477661069312?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1649602477661069312%7Ctwgr%5E46c6f0a9f3bcb6d752987527b3a77fe94f5f64eb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ravindra-jadeja-fumes-at-heinrich-klaasen-after-bizarre-clash-denies-wicket-allrounder-hurls-mouthful-ms-dhoni-cools-him-off-watch-5955171.html
जडेजाच्या हातून मयंकला बाद करण्याची संधी सुटताच जडेजा संतापला. त्याने मैदानातच हेन्रीच क्लासेनला खुन्नस दिली. मात्र, मयंकला या जीवदानाचा फायदा घेता आला नाही. तो 3 चेंडूनंतर बाद झाला. यावेळी मयंकने जडेजाच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला आणि यष्टीमागे उभ्या असलेल्या एमएस धोनी (MS Dhoni) याने त्याला यष्टीचीत केले. यानंतर जेव्हा मयंक तंबूच्या दिशेने जात होता, तेव्हा जडेजा रागातच होता आणि तो क्लासेनकडे एकटक पाहून काहीतरी बोलू लागला. त्यानंतर धोनीने जडेजाला शांत केले.
Aiden Markram ✅
Mayank Agarwal ✅Maheesh Theekshana & @imjadeja with the breakthroughs and @msdhoni with his magic 😉
Follow the match ▶️ https://t.co/0NT6FhLcqA#TATAIPL | #CSKvSRH pic.twitter.com/8YqdnUE3ha
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
सामन्याचा आढावा
जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादला 134 धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 18.4 षटकात 138 धावा केल्या. तसेच, 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. यावेळी चेन्नईकडून डेवॉन कॉनवे याने सर्वाधिक नाबाद 77 धावांची वादळी खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड यानेही 35 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. (video cricketer ravindra jadeja fumes at heinrich klaasen allrounder hurls mouthful ms dhoni cools him off)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एवढी हिंमत! स्टंपमागे धोनी असताना फलंदाजाने घेतली धाव, मग पुढे जे झालं ते तुम्हीच पाहा
‘जा कोचकडून शिकून ये, इथे वेगाला कुणी घाबरत नाही’, चालू सामन्यात भारतीय दिग्गजाचा उमरानला सल्ला