---Advertisement---

VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर फिन ऍलन एकदा नाहीतर दोनवेळा बाद, हा विचित्र प्रकार पाहाच

On: बुधवार, नोव्हेंबर 9, 2022 3:21 PM
Shaheen Shah Afridi
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूष क्रिकेट संघाच्या आठव्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup)पहिल्या उपांत्य फेरीचा सामना बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र कर्णधार केन विलियमसन याचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. पहिल्या दहा षटकातच न्यूझीलंडचे तीन खेळाडू 59 धावसंख्येवर तंबूत परतले. शाहीन शाह आफ्रिदी याने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरच फिन ऍलन याला बाद केले. ही विकेट वादग्रस्त ठरली.

या सामन्यात न्यूझीलंडने चौकाराने सुरूवात केली. पहिल्याच चेंडूवर फिन ऍलन (Finn Allen) याने ऑफ साइडला चौकार मारला. दुसरा चेंडू त्याच्या पॅडवर लागला आणि पंच मारेस इरास्मस यांनी त्याला बाद केले. तेव्हा लगेचच ऍलनने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसले की चेंडू पहिल्यांदा बॅटला लागला नंतर पॅडला, यामुळे टीव्ही अंपायरने त्याला नाबाद ठरवले.

शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा ऍलनच्या पॅडवर चेंडू लागला. तेव्हा पण ऍरास्मस याने त्याला बाद दिले आणि पुन्हा एकदा ऍलनने रिव्ह्यू घेतला. तेव्हा चेंडू बॅटला लागला नाही आणि विकेटला लागला हे स्पष्ट दिसते. टीव्ही अंपायरने त्याला बाद दिले. तो बाद झाल्यानतंर डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला शादाब खान याने मोठ्या शिताफीने धावबाद केले. तसेच सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॉनवे बाद झाला. तो 20 चेंडूत 21 धावा करत परतला. ग्लेन फिलिप्स हा पण 6 धावा करत मोहम्मद नवाजचा बळी ठरला.

या स्पर्धेत न्यूझीलंडने 5 पैकी 3 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. त्यांना केवळ इंग्लंडविरुद्ध पराभव स्विकारावा लागला. दुसरीकडे पाकिस्तान 5 पैकी 3 सामने जिंकत आणि 2 सामने गमावत सुपर 12च्या ग्रुप दोनच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला. Finn Allen gets out twice off on Shaheen Afridi bawling

टी20 आणि वनडे विश्वचषक मिळून पाकिस्तान आणि न्यूझीलंड चौथ्यांदा उपांत्य फेरीत आमने-सामने आले. यातील 1992, 1999 आणि 2007च्या सामन्यांमध्ये पाकिस्तान जिंकला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 क्रमवारीत सूर्या अव्वल स्थानावर कायम! केएल राहुल आणि अर्शदीप सिंगला फायदा, विराट 11व्या स्थानावर
अरे हे काय, ऍडलेड ओव्हलच्या सेमीफायनलमध्ये नाणेफेक ‘हरण्यासाठी’ रोहित-जोसमध्ये चढाओढ! कारणच चकित करणारे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---