---Advertisement---

शतक ठोकल्यानंतर जयसवालचे ड्रेसिंग रूममध्ये ग्रँड वेलकम; सहकाऱ्यांकडून टाळ्यांचा गजर, तर रोहितने थोपटली पाठ

Yashasvi-Jaiswal-Grand-Welcome
---Advertisement---

जेव्हाही एखादा फलंदाज शानदार कामगिरी करतो, तेव्हा संघसहकारी उभे राहून, टाळ्यांचा कडकडाट करून त्याचं अभिनंदन करतात. याचा अनुभव आता भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयसवाल यानेही घेतला. जयसवालने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या दिवशी शतक ठोकले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जेव्हा जयसवाल ड्रेसिंग रूममध्ये परतला, तेव्हा त्याचे जंगी स्वागत झाले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जयसवालचे जंगी स्वागत
यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टिच्चून फलंदाजी केली. त्याने यादरम्यान 350 चेंडूंचा सामना करताना 143 धावा केल्या. या धावा करताना त्याने 14 चौकारांचा पाऊस पाडला. आता चाहते त्याच्याकडून तिसऱ्या दिवशी द्विशतकाची अपेक्षा करत आहेत. असे असले, तरीही ज्यावेळी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा संघसहकाऱ्यांकडून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्याच्या स्वागतासाठी ईशान किशन, मोहम्मद सिराज, कर्णधार रोहित शर्मा आणि इतर सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी जयसवालला उभे राहून शाबासकी दिली.

जयसवालने शतक ठोकून आधीच इतिहास रचला आहे. मात्र, आता चाहत्यांना आशा आहे की, तो शतकाचे रूपांतर द्विशतकात करेल. पहिल्या दोन दिवशी जयसवाल वेगाने फलंदाजी करताना दिसला नाही. मात्र, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ वेगाने धावा करून आघाडी वाढवून वेस्ट इंडिजला फलंदाजीचे आमंत्रण देऊ शकतो.

भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावत 312 धावा केल्या. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या शतकाचाही समावेश आहे. त्याने 103 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त शुबमन गिल फक्त 6 धावा करून बाद झाला. तसेच, जयसवाल नाबाद 143 आणि विराट कोहली (Virat Kohli) नाबाद 36 धावांवर खेळत आहेत.

वेस्ट इंडिज संघाचा डाव
तत्पूर्वी वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 150 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना आर अश्विन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला. त्याच्याव्यतिरिक्त रवींद्र जडेजाने 3, तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. (video grand welcome to centuryman yashasvi jaiswal in the dressing room stood up and saluted)

महत्वाच्या बातम्या-
फाफच्या सुपर किंग्सचा अमेरिकन लीगमध्ये धमाका, नाईट रायडर्सविरुद्ध 69 धावांनी मिळवला दणदणीत विजय
‘भें***’, शतकवीर जयसवालकडून पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजच्या खेळाडूला शिवीगाळ, व्हिडिओ लगेच पाहा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---