---Advertisement---

केन विलियमसनला बाद करण्यासाठी क्षेत्ररक्षकाला करावे लागले विशेष प्रयत्न, ते पाहून तुम्हीही व्हाल दंग

On: शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022 8:47 PM
WIvsNZ
---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन टी२० सामने खेळले जाणार आहे. यातील पहिला सामना जमैकाच्या सबिना पार्कवर पार पडला. पहिल्याच सामन्यात यजमान संघाचे जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे. या सामन्यात शिमरन हेटमायरने सीमारेषेवर मार्टिन गप्टीलचा अप्रतिम झेल पकडला. त्यानंतर हेडन वॉल्शने फॉर्ममध्ये असणाऱ्या कर्णधार केन विलियनसनचा सीमारेषेवर चकित करणारा झेल पकडला आहे.

हेडन वॉल्शने घेतला खेळपट्टीवर टिकून असलेल्या विलियमसनचा झेल

वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टी२० सामना खेळला गेला. या सामन्यात गोलंदाज हेडन वॉल्श याने केन विलियमसन (Kane Williamson) याचा झेल तेव्हा पकडला जेव्हा तो खेळपट्टीवर टिकून होता. विलियमनने ओडियन स्मिथ याच्या चेंडूवर एक शॉट मारला, त्याला वाटले तो सीमारेषेपार जाईल. तेथेच क्षेत्ररणासाठी उभ्या असलेल्या वॉल्शने हवेत सूर मारत हा झेल पकडला आहे. त्याच्या या झेलमुळे विलियमसन ४७ धावा करत तंबूत परतला.

यजमान संघ पराभूत

पहिल्याच सामन्यात यजमान संघ वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडने त्यांचा १३ धावांनी पराभव केला आहे. यामुळे न्यूझीलंड तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी पुढे आहे.

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यामुळे न्यूझीलंड संघातेन प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ विकेट्स गमावत १८५ धावा केल्या. त्याच्या बदल्यात वेस्ट इंडिजचा संघ २० षटकात ७ बाद १७२ धावाच करू शकला. शामराह ब्रुक्सने सर्वाधिक अशा ४२ धावा आणि रोमारियो शेफर्डने नाबाद ३१ धावा केल्या.

या सामन्यात न्यूझीलंडकडून डेवोन कॉनवे याने २९ चेंडूत ४३ आणि विलियमसनने ३३ चेंडूत ४७ धावा केल्या. तर गोलंदाजीत मिचेल सॅंटनरने १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडिज संघाची पराभवाची घरच्या मैदानावर मालिका सुरूच आहे. दुसऱ्या सामन्यात तरी त्यांना यश मिळेल अशी आशा आहे. या मालिकेतील दुसरा सामना १२ ऑगस्टला खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! २०२३ मध्ये ‘या’ महिन्यात होणार महिला आयपीएलचे आयोजन

अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या मौसमातून अनुभवायला मिळणार अस्सल ‘देशी खो खो’चे नव्या रूपात दर्शन

पंत कार्तिकच्या जागी ‘या’ खेळाडूला खेळू द्या! माजी दिग्गजानं बीसीसीआयला सुचवलाय नवा पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---