भारत विरूद्ध श्रीलंका टी२० सामन्यात भारतीय संघाने काल ६ विकेटने विजय मिळवला. त्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरला सामनावीर घोषीत करण्यात आले.
या सामन्यात ज्या ४ विकेट भारतीय संघाने गमावल्या त्यातील केएल राहूल हा हिट विकेटचा शिकार ठरला. १७ चेंडूत १८ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. परंतु त्याचा एक फटका मारताना स्टंपला पाय लागून बेल्स पडल्यामूळे तो हिट विकेट ठरला.
१०व्या षटकात जीवन मेंडीसचा एक चेंडू खेळत असताना तो अशाप्रकारे बाद झाला.
याबरोर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये हिट विकेट ठरलेला तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये अाजपर्यंत ९ खेळाडू हीट विकेट ठरले आहेत.
यापुर्वी आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये एबी डी विलीयर्स, दिनेश चंडीमल, मिसबाह उल हक सारखे खेळाडू हिट विकेट ठरले आहे.
Video:
KL Rahul @klrahul11
being the first Indian to be dismissed hit- wicket in T20I 😏@BCCI @BCCIWomen @BCCIdomestic
Video credit – @DSportINLive #SLvInd #NidahasTrophy #INDvSL
… https://t.co/PKCpLD0ZMG— Virat KING Kohli (@KinggKohli) March 12, 2018