---Advertisement---

Video : आयपीएल शूट दरम्यान केएल राहुलला राग अनावर, म्हणाला, ”हे कोण लिहितंय…

On: शनिवार, फेब्रुवारी 24, 2024 6:41 PM
KL-Rahul
---Advertisement---

आयपीएल सुरु होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तर गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिला सामना होणार आहे. पण या तयारीदरम्यान भारतीय खेळाडू चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. प्रथम, हार्दिक पांड्याचा आयपीएल शूटवरील व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये तो त्याच्या आहाराबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत होता. त्यानंतर आता स्टार फलंदाज केएल राहुलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

तसेच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये IPL शूटमधील स्क्रिप्ट पाहून केएल राहुल कर्मचाऱ्यावर भडकला असून तो म्हणाला आहे की, हे सगळं कसं आठवणार भाऊ? जर मला लक्षात ठेवायचे कसे माहित असते, तर मी माझा अभ्यास थोडा गंभीरपणे घेतला असता. हे सर्व विनोद आहे का? मॅच डे प्रोमो इंग्रजी, मॅच डे प्रोमो हिंदी, मॅच डे प्रोमो कन्नड. जर मी व्यवस्थापित केले तर तुम्ही काहीही करू शकता.

मी तीन वेळा एकच सांगतोय, पब्लिक कंटाळतील, त्यांना हे सर्व बघायचे नाही. असे कोणते प्रश्न आहेत, हे सर्व कोण लिहित आहे? स्टार स्पोर्ट्सचा टॉक शो चालू नसून आयपीएल आहे. तसेच  दिग्दर्शक कोण आहे, हे कोणी लिहिले आहे? राहुलच्या रागानंतर शेवटी कर्मचारी म्हणाला आहे की, ‘साहेब, तुम्ही हे विसरा, आम्ही तुम्हाला दुसरी स्क्रिप्ट देऊ.’ राहुल शेवटी म्हणाला, ‘वेळ वाया गेला.’

याबरोबरच, याआधी व्हिडीओ क्लिपमध्ये हार्दिक पांड्या सुरुवातीला शांत होता. पण डेक्सवर नाश्ता पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जलेबी, फाफडा पाहून त्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. “हे काय आहे. मी जलेबी कसं खाणार..काय ढोकला..हे सर्व काय आहे..भाई फिटनेस करायचं असतं. हे कसं खाणार मी..कोणी पाठवलं हे..” असं हार्दिक पांड्या म्हणत असताना कर्मचारी त्याला एडजस्ट करण्याची विनंती करतो. “अरे भाई एडजस्ट नाही होत. शेफ आणि न्यूट्रिशियन्स कुठे आहेत. ”

त्यानंतर कर्मचारी हार्दिक पांड्याला म्हणाला आहे की, शेफला लेट झालं. आजचा दिवस खा..जलेबी खा आणि पात्राही आहे. त्यावर हार्दिक पांड्या म्हणाला की, “भाऊ, कसं खाणार हे. डायरेक्टर साहेबांना सांगा हे नाही चालणार. हे खाऊन माझा स्टॅमिना बिघडून जाईल.”

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---