---Advertisement---

भीमपराक्रम! जयस्वालकडून मोडीत निघाला 16 वर्ष जुना विक्रम, सेहवागला न जमलेली कामगिरी एका वर्षात केली

On: शनिवार, फेब्रुवारी 24, 2024 6:16 PM
Rohit-Sharma-And-Yashasvi-Jaiswal
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सध्या रांचीमध्ये खेळला जात आहे. शनिवारी (24 फेब्रुवारी) म्हणजे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडकडे 134 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने 7 बाद 219 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल सोडला, तर सर्व भारतीय फलंदाज रांची कसोटीच्या पहिल्या डावात अपयशी ठरले. अर्धशतकी खेळीदरम्यान, जयस्वालच्या नावावर एक मोठा विक्रम देखील नोंदवला गेला.

जयस्वालने भारतासाठी रांची कसोटीच्या पहिल्या डावात 117 चेंडूत 73 धावा केल्या. यात 8 चौकार आणि एक षटकार होता. या एका षटकाराच्या जोरावर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. रांची कसोटीपूर्वी जयस्वाल आणि माजी दिग्गज विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) हे या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. आता एकटा जयस्वाल पहिल्या स्थानी आहे. (Yashasvi Jaiswal has become the batsman who has hit the most sixes in a calendar year)

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी षटकार मारणारे भारतीय खेळाडू –
यशस्वी जयस्वाल – 23* (2024)
विरेंद्र सेहवाग – 22 (2008)
रिषभ पंत – 21 (2022)
रोहित शर्मा – 20 (2019)
मयंक अगरवाल – 18 (2019)

रांची कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या – 
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन । भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात
भारतीय संघात ‘असा’ डावखुरा फलंदाज आधी कधीच झाला नाही! यशस्वीने मोडला गांगुलीचा मोठा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---