---Advertisement---

VIDEO: टी20 विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी सामना? विल्यमसन उत्तरला, ‘हार्दिक तुला काय…’

Kane Williamson & Hardik Pandya
---Advertisement---

भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरूवात शुक्रवारी (18 नोव्हेंबर) होणार होती, मात्र वेलिंग्टन येथे खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द झाला. आता हे दोन्ही संघ माउंट मौनगानुई येथे दिसतील. त्याआधी हार्दिक पंड्या आणि केन विल्यमसन यांना पहिला सामना रद्द झाल्यानंतर काही प्रश्न विचारले गेले. ज्यामध्ये एक प्रश्न असा होता की, टी20 विश्वचषकात जर तिसऱ्या स्थानासाठी सामना झाला असता तर काय झाले असते हा प्रश्न प्रस्तुतकर्त्याने विचारला. यावर किवी कर्णधाराने ते प्रत्युत्तर दिले ते जोरदार व्हायरल होत आहे.

दोन्ही संघांना टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत उपांत्य फेरीचे सामने गमवावे लागले. भारत त्यांच्या ग्रुपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर राहिला. त्यातच पहिला टी20 सामना पावसाने रद्द झाल्याने चांगली सुरूवात करण्याच्या दोन्ही संघाच्या प्रयत्नावर पावसाने पाणी फेरले. यावेळी त्यांना प्रस्तुतकर्त्याने टी20 विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी दुसरा सामना झाला असता तर हा प्रश्न विचारला. ज्यावर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) दोघांनी उत्तरे दिली.

“विश्वचषक झाला, ते आता मी मागे टाकले आहे. निराशा ही असणारच, मात्र मागे जाऊन आम्ही ते बदलू शकत नाही. आम्ही या मालिकतून पुढे जाण्याचा विचार करत आहोत,” असे हार्दिकने म्हटले. हार्दिकला विचारलेला प्रश्न प्रस्तुतकर्त्याने विल्यमसनलाही विचारला. त्यावर त्याचे उत्तर ऐकण्याजोगे होते.

विल्यमसन हसला आणि म्हणाला, “माझा त्यावर विश्वास नाही. तसेच माझ्यामते तसा सामना खेळणे योग्य नाही. हार्दिक यावर तुला काय म्हणायचे आहे.” त्यानंतर दोन्ही कर्णधार भरपूर हसले.

आम्ही नवीन सुरूवात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हा दोन्ही संघाचा अंतिम सामन्यात जाण्याचा विचार होता, मात्र तसे झाले नाही आणि आम्हाला ही मालिका सुरू होण्याआधी एका आठवड्याची विश्रांती मिळाली, असेही विल्यमसनने पुढे म्हटले.

 

या मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 12 वाजता खेळला जाणार असून त्याचे थेट प्रक्षेपण ऍमेझॉन प्राईम, डीडी स्पोर्ट्सवर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल सहा वर्षांनी स्मिथने जुना फॉर्म मिळवला, नाबाद 80 धावा कुटल्यानंतर दिली खास प्रतिक्रिया
न्यूझीलंडची साथ सोडलेल्या बोल्टबद्दल हे काय म्हणाला साथीदार साऊदी?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---