---Advertisement---

Video: मिशेल स्टार्कचा रुद्रावतार! कर्णधाराच्या ‘त्या’ निर्णयामुळे रागाने जमिनीवर आदळली बॅट

---Advertisement---

ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेडमध्ये तस्मानिया आणि न्यू साउथ वेल्स यांच्यात शेफील्ड शील्ड स्पर्धेचा आठवा सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल स्टार्क हा न्यू साऊथ वेल्सकडून खेळत होता. या सामन्यात त्याचं वेगळंच रूप पाहायला मिळालं. सामन्यादरम्यान न्यू साऊथ वेल्सच्या कर्णधाराने घेतलेल्या एका निर्णयामुळे स्टार्कचा पारा चांगलाच चढला.

न्यू साउथ वेल्स संघ पहिल्या डावात अवघ्या 64 धावा करून सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात न्यू साऊथ वेल्स संघ फलंदाजीसाठी आला. स्टार्कने 132 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधाराने डाव घोषित केला.

कर्णधार डाव घोषित करताच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचे प्रथम श्रेणीतील पहिले शतक शतक हुकले. त्याने या निर्णयावर संताप व्यक्त केला. डाव संपल्यानंतर तंबूत परतल्यावर स्टार्कने रागाने आपली बॅट मैदानावर आपटली. क्रिकेट ऑस्ट्रेलिया डॉट कॉम डॉट एयूने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

https://twitter.com/cricketcomau/status/1326066641986154497?s=20

डावाच्या सुरुवातीला निक लार्किन, मोइसेस हॅन्रिक्स आणि सीन ऍबॉट या फलंदाजांनी शतके ठोकली. स्टार्कदेखील 100 धावांचा पल्ला गाठणार होता. परंतु कर्णधार पीटर नेव्हिलेने 522 या धावसंख्येवर डाव घोषित करण्याच्या निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-

-Video -“तुला ऑस्ट्रेलियातच भेटेल”, डेविड वॉर्नरचा हैदराबादच्या यॉर्कर किंगला खास संदेश

-खूपच वाईट! सर्व प्रयत्न करूनही फलंदाज झाला विचित्र पद्धतीने बाद, पाहा Video

-Qualifier 2 : कागिसो रबाडाच्या स्विंगमुळे वॉर्नरची दांडी गुल, पाहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख-

-चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल

-राजधानी एक्सप्रेस ! ‘हा’ एकटा एकीकडे आणि दुसऱ्या संघाचे आख्खे गोलंदाज एकीकडे, वाचा दिल्लीच्या सरकार गोलंदाजाबद्दल

-प्रतिस्पर्ध्याला दिवसा चांदणं दाखवणारा दिल्लीचा हा पठ्ठ्या म्हणजे दिल्ली कॅपिटल्सची जान आहे जान !!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---