---Advertisement---

VIDEO: ओडेन स्मिथचा प्रताप! एकाच षटकात लगावले 5 गगनचुंबी षटकार

---Advertisement---

सध्या वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) स्पर्धा खेळली जात आहे. स्पर्धेची साखळी फेरी अखेरच्या टप्प्यात आले असताना सर्व संघ प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.‌ बुधवारी (21 सप्टेंबर) सीपीएलमध्ये जमैका तल्लावाज आणि गयाना ऍमेझॉन वॉरियर्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात गयाना संघाकडून खेळणारा अष्टपैलू ओडेन स्मिथने तुफानी फलंदाजी करत एकाच षटकात पाच षटकार ठोकत संघाच्या विजयात योगदान दिले. त्याच्या या फलंदाजीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

या सामन्यात प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या गयाना संघाची फलंदाजी तितकीशी चांगली झाली नाही. 15.3 षटकात त्यांनी 98 धावांवर 8 बळी गमावले होते. शाई होपने या दरम्यान अर्धशतक झळकावलेले. मात्र, त्यानंतर अखेरच्या तीन षटकांमध्ये ओडेन स्मिथ व कीमो पॉल यांनी अक्षरशः धावांचा धबधबा सुरू केला. त्यांनी अखेरच्या तीन षटकात तब्बल 74 धावा फटकावल्या. गयाना संघाच्या डावातील 19 वे षटक युवा वेगवान गोलंदाज मिग्युएल प्रिटोरियसने टाकले. त्या षटकात स्मिथने पाच षटकार लगावले. तो केवळ दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकू शकला नाही. तसेच प्रिटोरियसने एक वाईड चेंडू टाकला. त्यामुळे या षटकात 31धावा निघाल्या.

स्मिथच्या फलंदाजीमुळे गयाना संघाने 20 षटकात 178 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, जमैका तल्लावाज संघ ब्रेंडन किंगच्या शतकानंतरही विजयी लक्ष पार करू शकला नाही. स्मिथने गोलंदाजीतही शानदार कामगिरी करत दोन बळी मिळवले. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात करण्यात आले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया2022 स्पर्धेच्या यजमान शहराच्या लोगोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते अनावरण
INDvsAUS: हैद्राबादमध्ये तिकीटांसाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा; पोलिसांचा लाठीचार्ज, जखमींचा आकडा…
बापरे! तब्बल २२ क्रिकेटपटूंच्या ऑटोग्राफला मिळाला होता केवळ एक रुपया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---