---Advertisement---

Video: मालिका निर्णायक सामन्याआधी हेड कोच गंभीर देवाच्या चरणी, व्हिडिओ व्हायरल

On: शुक्रवार, जानेवारी 16, 2026 12:50 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवारी (१८ जानेवारी) खेळला जाणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने शेवटचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. या मालिकेतील दुसरा सामना भारताने गमाल्याने चोहोबाजूंनी संघावर टीका होत आहे. यातच संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी शुक्रवारी (१६ जानेवारी) उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेतले. त्याचा मंदिरातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

गंभीरने मंदिराच्या पहाटेच्या भस्म आरतीत सहभाग घेतला होता. दर्शनानंतर त्याने येथिल व्यवस्था आणि सुरक्षा उत्तम असल्याचे विधान केले. भविष्यात पुन्हा येण्याबाबतही सांगितले. त्याच्या या मंदिराच्या भेटीनंतर आणि संघाची सद्यस्थिती यांची एकच चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय संघ सध्या बिकट स्थितीत आहे. न्यूझीलंड विरुद्धचा पहिला वनडे सामना ४ विकेट्सने जिंकत भारताने मालिकेती उत्तम सुरूवात केली होती. दुसरा वनडेही जिंकू असे वाटत असताना न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेल आणि विल यंग यांनी उत्तम फलंदाजी करत मालिका बरोबरीत केली.

राजकोट वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या दोन विकेट लवकर घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजीची लय बिघडली आणि यजमानांनी सामना ७ विकेट्सने गमावला. यामध्ये भारताचे फिरकीपटू कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांना मिचेल आणि यंगने चांगलेच धुुतले. हर्षित राणा याने पहिली विकेट घेतली, मात्र त्यानेही ९.३ षटकात ५२ धावा दिल्या. या सामन्यात भारताकडून केएल राहुल आणि न्यूझीलंडकडून मिचेल यांनी त्यांच्या वनडे कारकिर्दीतील आठवे शतक केले.

वनडे मालिकेतील तिसरा सामना इंदौरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरेल याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. वनडे मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. आगामी टी२० विश्वचषकाची पुर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---