भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेली टी20 मालिका रविवारी (दि. 3 डिसेंबर) संपली. अखेरचा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 6 धावांनी विजय मिळवला. मात्र, या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले. आता यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर, या सामन्यादरम्यान अखेरच्या षटकात फलंदाजाने मारलेला चेंडू पंचांना जाऊन लागला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज हसताना दिसला.
पंचांना लागला चेंडू
ऑस्ट्रेलिया संघाला अखेरच्या षटकात विजयासाठी 10 धावांची गरज होती. कर्णधार मॅथ्यू वेड क्रीझवर होता. मात्र, अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि भारताचा विजय पक्का केला. असे असले, तरीही अखेरच्या षटकातील एक घटनेने कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकातील अखेरच्या 2 चेंडूंवर विजयासाठी 9 धावांची गरज होती. अर्शदीप सिंग याच्या चेंडूवर नेथन एलिस (Nathan Ellis) याने समोरच्या दिशेने जोरदार फटका मारला. यावेळी पंच वेगाने बाजूला सरकले, पण चेंडू अर्शदीपच्या हाताला लागला आणि पंच केएन अनंत पद्मनाभन यांच्या दिशेने गेला. त्यांनी कितीही प्रयत्न करूनही ते यावेळी स्वत:ला चेंडूपासून वाचवू शकले नाहीत. यावेळी चेंडू त्यांच्या उजव्या मांडीला (KM Anantha Padmanabhan hit by Ball) जाऊन लागला. यावेळी त्यांना वेदना झाल्याच्या दिसल्या.
टीम डेविड लागला हसू
चेंडू लागल्यानंतर पंच अनंत पद्मनाभन (Umpire KM Anantha Padmanabhan) यांच्या वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. मात्र, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज टीम डेविड (Tim David) मात्र डगआऊटमध्ये बसून हसत होता. पंचांना दुखापत झाल्यानंतर कॅमेरा थेट डेविडकडे गेला. यावेळी तो सतत हसत होता. कर्णधार मॅथ्यू वेड (Matthew Wade) त्याच्या पुढे बसला होता, पण तो एकदम शांत आणि गंभीर चेहरा करून बसला होता. आता यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/JioCinema/status/1731373123214471316
https://twitter.com/thecricketgully/status/1731356417804669036
https://twitter.com/theFaizFazel/status/1731357494331773017
सामन्यात काय घडलं?
भारतीय संघाने रविवारी पाचव्या आणि अंतिम टी20 सामन्यात फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 160 धावा केल्या होत्या. यामध्ये श्रेयस अय्यर याच्या 53 धावांचाही समावेश होता. अय्यरने कठीण खेळपट्टीवर अर्धशतक झळकावले. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ 8 विकेट्स गमावत 154 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडर्मोट याने 36 चेंडूत 5 षटकारांच्या मदतीने 54 धावा करत अर्धशतकही पूर्ण केले. भारतासाठी यावेळी मुकेश कुमार याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. (video viral tim david laughing when umpire hit by ball ind vs aus)
हेही वाचा-
शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांचा बचाव करणाऱ्या अर्शदीप सिंगचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘सूर्या म्हणालेला…’
मालिका खिशात घालताच गगनात मावेनासा झाला सूर्याचा आनंद, म्हणाला, ‘आम्हाला निर्भीडच व्हायचं होतं…’