भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मिराबाई चानू यांना आज(25 सप्टेंबर) दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
क्रिडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळवणारा विराट हा केवळ तिसराच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर(1997-98) आणि एमएस धोनी(2007) यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळला आहे.
#NationalSportsAwards2018 : Indian cricket captain @imVkohli receives #RajivGandhiKhelRatnaAward , 2018 pic.twitter.com/94DuI18MwV
— DD News (@DDNewslive) September 25, 2018
तसेच मिराबाई ही सुद्धा हा पुरस्कार मिळवणारी तिसरीच वेटलिफ्टर आहे. या आधी 1994-95 ला कर्णम मल्लेश्वरी आणि 1995-96ला एन कुंजुरानी या वेटलिफ्टर्सना हा पुरस्कार देण्यात आला होता.
#NationalSportsAwards2018 : World Champion Weightlifter @mirabai_chanu receives #RajivGandhiKhelRatnaAward , 2018 pic.twitter.com/AMpfHlTshh
— DD News (@DDNewslive) September 25, 2018
विराट आणि मिराबाईसह आत्तापर्यंत 36 खेळांडूंना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कारची सुरुवात 1991-92मध्ये झाली आहे.
या पुरस्कारासाठी कोहलीला 2016 आणि 2017 अशी दोन्ही वर्षी या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. पण या दोन्ही वर्षी त्याच्या नावावर पुरस्कार निवड समितीने सहमती दाखवली नव्हती.
2016 ला साक्षी मलिक, पीव्ही सिंधू आणि दीपा कर्मारकरला त्यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता.तर 2017 ला भारताचा माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग आणि पॅरा अॅथलिट देवेंद्र झांजारियाला खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
विराट हा सध्या आयसीसीच्या कसोटी आणि वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. तसेच त्याची कामगिरीही मागील काही वर्षांपासून चांगली झाली आहे.
अशी आहे कोहलीची कामगिरी-
कोहलीने आत्तापर्यंत कसोटीत 71 सामन्यात 6147 धावा, वनडेत 211 सामन्यात 9779 धावा आणि 62 टी20 सामन्यात 2102 धावा केल्या आहेत. तसेच त्याने कसोटीत 23 शतके आणि वनडेत 35 शतके असे मिळून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 58 शतके केली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्यात तो सचिन तेंडुलकर नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
याबरोबरच खेलरत्न पुरस्कार मिळण्याआधी पद्मश्री पुरस्कार मिळवणारा कोहली हा दुर्मिळ खेळाडूंपैकी एक आहे.
त्याने कर्णधार म्हणून भारत दौऱ्यावर आलेल्या आॅस्ट्रेलिया, इंग्लंड या संघाना पराभूत केले आहे. तसेच विंडिज आणि श्रीलंकेच्या दौराही यशस्वी केला आहे. त्याचबरोबर त्याने वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या मालिकांमध्ये विजय मिळवला होता.
कोहली हा 2011 विश्वचषक आणि 2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. त्याला आयसीसीने 2012 आणि 2017 ला वनडेतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कारही दिला होता.
तसेच 2017 ला तो आयसीसीच्या क्रिकेटर आॅफ द इयर ( वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू) पुरस्काराचा मानकरीही ठरला होता. त्याचबरोबर बीसीसीआयचा त्याला पाच वेळा क्रिकेटर आॅफ द इयर पुरस्कार मिळाला आहे.
तो नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला असून त्याने या दौऱ्यात 894 धावा केल्या आहेत. पण त्याच्या या कामगिरीचा या पुरस्काराच्या शिफारसीसाठी विचार करण्यात आलेला नाही.
अशी आहे मिराबाई चानूची कामगिरी-
तीने मागील वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या 48 किलो वजनीगटात विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. तसेच ती यावर्षी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक विजेती होती.
तिच्याकडून भारताला 2020 ला होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये एकमेव पदकाची अपेक्षा आहे. सध्या ती पाठिच्या दुखापतीतून सावरत आहे. या दुखापतीमुळे तीला इंडोनेशियाला झालेल्या एशियन गेम्समध्येही सहभागी होता आले नव्हते.
महत्वाच्या बातम्या –
–टीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण
–एमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार
-…आणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल