पुणे – विद्या व्हॅली स्कूल-बालेवाडी, विबग्योर इंटरनॅशनल स्कूल-पिंपळे सौदागर आणि एसएनबीपी स्कूल, मोरवाडी ’ड’ शाळेच्या संघांनी तिसर्या एसएनबीपी आंतरशालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेत फुटबॉल स्पर्धेत आपापल्या वयोगटात बाजी मारली.
एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, चिकली येथे सुरू असलेल्या स्पर्धेत 10 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत विद्या व्हॅली स्कूल, बालेवाडी संघाने एसएनबीपी रहाटणी संघावर 4-0 असा सहज विजय मिळवला. आदिराज चांदेरेचे दोन तसेच सायरस जीजीभॉय आणि एकांश ओझाचा प्रत्येकी एक गोल त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. द अकॅडमी स्कूलने तिसरा क्रमांक मिळवला. त्यांनी एसएनबीपी चिकली संघाचा 2-0 असा पराभव केला.
14 वर्षांखालील गटात विबग्योर इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे सौदागरने एस.बी. पाटील स्कूलवर 3-1 अशी मात करताना जेतेपद पटकावले. तीन गोल करणारा रौनीत मेनन त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. प्रतिस्पर्धी संघाकडून एकमेव गोल अनिश राऊतने केला. तिसर्या क्रमांकासाठीच्या लढतीत एसएनबीपी स्कूलचे दोन्ही संघ आमनेसामने होते. त्यात स्वरूप थिगळे यांच्या नेतृत्वाखालील मोरवाडी स्कूलने चिखली ’अ’ संघावर मात केली.
दरम्यान, 17 वर्षांखालील गटात अनुक्रमे एसएनबीपी, मोरेवाडी आणि चिखली संघ विजेते ठरले. मुले गटात मोरवाडी संघाने रहाटणी स्कूलला 2-0 आणि चिखली संघाने रहाटणी स्कूलला 3-2 असे हरवले.
निकाल
मुले- 10 वर्षांखालील (अंतिम सामना): विद्या व्हॅली स्कूल, बालेवाडी: 4(सायरस जीजीभॉय 1; आदिराज चांदेरे 2; एकांश ओझा 1) विजयी वि. एसएनबीपी स्कूल, रहाटणी: 0.
तिसरे स्थान: द अकॅडमी स्कूल: 2 (अवयुक्त पटेल 2) विजयी वि. एसएनबीपी, चिखली: 0
12 वर्षांखालील (अंतिम सामना): द अकॅडमी स्कूल: 3 (वेदांत महाडिक 2; इशान भावे 1) विजयी वि. विद्या व्हॅली स्कूल, बालेवाडी: 1 (मल्हार देशमुख).
तिसरे स्थान: एसएनबीपी स्कूल, चिखली ’अ’: 2 (कार्तिक मुळे; आरुष जिकर) विजयी वि. एसएनबीपी स्कूल, वाघोली: 1 (राजीर्थ).
14 वर्षांखालील (अंतिम सामना): विबग्योर इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे सौदागर: 3(रौनीत मेनन 3) विजयी वि. एस. बी. पाटील स्कूल, रावेत:1(अनीश राऊत).
तिसरे स्थान: एसएनबीपी स्कूल, मोरवाडी ’अ’: 1 (स्वरूप थिगळे) विजयी वि. एसएनबीपी स्कूल, चिखली ’अ’: 0
17 वर्षांखालील(अंतिम सामना): एसएनबीपी स्कूल , मोरवाडी ’ड’: 2 (हर्षल माने; गौरांग घाणेकर प्रत्येकी 1) विजयी वि. एसएनबीपी स्कूल , रहाटणी ’ब’: 0.
तिसरे स्थान: एसएनबीपी स्कूल, चिखली ’ब’:1(गौरव चतुर्वेदी) विजयी वि. एसएनबीपी स्कूल, रहाटणी ’अ’: 0.
मुली
17 वर्षांखालील, अंतिम सामना: एसएनबीपी स्कूल, चिखली ’अ’: 3(मृणाल साखरे, अवनी गायकवाड, स्नेहल नरवाळे प्रत्येकी 1) विजयी वि. एसएनबीपी स्कूल, रहाटणी: 2 (इप्सिता गावरी, समिक्षा साबळे प्रत्येकी 1)
तिसरे स्थान: एसएनबीपी स्कूल, मोरवाडी ’अ’: 1 (वैष्णवी शिरसाट) विजयी वि. एसएनबीपी स्कूल, मोरवाडी ’ब’: 0.