इंडियन प्रीमीयर लीग(आयपीएल) मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाने त्यांच्या नवीन लोगोचे काल(14 फेब्रुवारी) अनावरण केले आहे. या नवीन लोगोवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये आरसीबीचे माजी संघमालक विजय मल्ल्यानेही नवीन लोगोवर प्रतिक्रिया दिली आहे.
आरसीबीने काल या लोगोचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. तसेच लोगोचा फोटोही शेअर केला. याबरोबरच त्यांनी 2008 पासून आत्तापर्यंत बदललेल्या लोगोंचाही व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना मल्ल्याने ट्विट केले आहे की ‘छान…पण ट्रॉफी जिंका!’
Great…but win the trophy !
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 15, 2020
आरसीबीने आत्तापर्यंत आयपीएलच्या सर्व 12 मोसमात सहभाग घेतला आहे. मात्र त्यांना विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. त्यांनी 2009, 2011 आणि 2016 असे तीन वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र तिन्हीवेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना अजून पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतिक्षा आहे.
त्याचबरोबर मल्ल्या यांनी आरसीबीची विराटची प्रशंसा केलेली एक पोस्ट रिट्विटही केली आहे. तसेच ही पोस्ट रिट्विट करताना त्यांनी लिहिले आहे की ‘विराट 19 वर्षांखालील भारतीय संघातून आरसीबीमध्ये आला. विराटने यशस्वीरित्या भारताचे नेतृत्त्व केले आहे आणि तो एक शानदार कामगिरी करणारा खेळाडू देखील आहे. सर्वकाही त्याच्यावर सोडून द्या आणि त्याला स्वातंत्र्य द्या. सर्व आरसीबी चाहत्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची अनेक वर्षांपासून इच्छा आहे.’
Virat came to RCB from the India U 19 squad. Virat has led India to great success and has been an outstanding performer himself. Leave it to him and give him the freedom. All RCB fans want that long overdue IPL trophy. https://t.co/RT7cNdWgWN
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 15, 2020
एवढेच नाही तर मल्ल्याने आरसीबीचे अनेक ट्विट रिट्विट केले आहेत. तसेच आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद जिंका हा संदेश आरसीबीचे अनेक ट्विट रिट्विट करताना त्यांनी प्रत्येकवेळी दिला आहे.
Correct…you are not done yet. All RCB fans want the trophy. https://t.co/7I09bBFtSa
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 15, 2020
Sure..Roar load like a Lion but bring the IPL trophy home to Bangalore. https://t.co/Ix3bhoOIlG
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 15, 2020
आरसीबीच्या या नवीन लोगोमध्ये त्यांचा प्रमुख लाल रंग बॅकग्राउंडला आहे. तसेच सोनेरी रंगाचा सिंह मागील 2 पायांवर उभा असून गर्जना करत आहे. तसेच त्याखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघाचे नाव लिहिलेले आहे.
अनिल कुंबळेकडून गोलंदाजीचे धडे गिरवण्यास युवा भारतीय संघाचा 'हा' खेळाडू उत्सुक
वाचा- ????https://t.co/qlXI56REI3????#म #मराठी #Cricket #TeamIndia @anilkumble1074— Maha Sports (@Maha_Sports) February 15, 2020
या कारणामुळे घडली चेंडू छेडछाडीची घटना, रिकी पाँटिंगने केला खूलासा
वाचा- ????https://t.co/wakw6sZziF????#म #मराठी #Cricket #Australia @RickyPonting— Maha Sports (@Maha_Sports) February 14, 2020






