मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व वारसलेन क्रीडा मंडळ वरळी गाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुमार गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा काळ (२ मे) उद्घाटन झाले. २४ संघानी सहभाग घेतलेल्या यास्पर्धेत सर्व सामने बाद पध्दतीने खेळवण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नियोजित कार्यक्रमानुसार ४ सामने होते. विजय क्लब विरुद्ध ओम ज्ञानदीप मंडळ यांच्यात उद्घाटनाचा सामना झाला. विजय क्लबने आक्रमक सुरुवात करत २९-०८ अशी मध्यंतरापर्यत आघाडी मिळवली होती. सुधीर सिंगच्या आक्रमक खेळाच्या जोरावर विजय क्लबने ५१-१६ असा विजय मिळवला. ओम ज्ञानदीपच्या शशांक मोकलने एकाकी झुंज दिली.
वीर संताजी विरुद्ध नवनाथ क्रीडा मंडळ यादुसऱ्या सामन्यांत नवनाथ क्रीडा मंडळ अनुपस्थित राहिल्यामुळे वीर संताजी संघास पुढे चाल देण्यात आली. अमरप्रेम क्रीडा मंडळ विरुद्ध अमर क्रीडा मंडळ दादर यांच्यात झालेल्या लढतीत अमरप्रेम क्रीडा मंडळाने ५०-१६ अशी बाजी मारत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
अशोक मंडळ विरुद्ध अमर क्रीडा मंडळ काळाचौकी यांच्यात चांगली लढत बघायला मिळाली. मध्यंतरापर्यत २३-१७ अशी आघाडी असणाऱ्या अशोक मंडळाने उत्तरार्धात आपली आघाडी कायमठेवत ४२-३७ असा विजय मिळवत दुसऱ्याफेरीत प्रवेश मिळवला