रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल 2024 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. पहिल्या 8 पैकी 7 लढती गमावलेल्या या संघानं शेवटचे 6 सामने सलग जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. एकेवेळी आरसीबीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचं वाटत होतं, परंतु कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांनी पराभव स्वीकारला नाही आणि जिद्दीनं आगेकूच करत राहिले. शनिवारी (18 मे) आरसीबीनं सीएसकेचा 27 धावांनी पराभव करत मोठ्या दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर आता विजय माल्ल्या यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे पूर्वीचे मालक विजय माल्ल्या यांनी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध संघानं मिळवलेल्या 27 धावांच्या विजयानंतर ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अभिनंदन करणारी पोस्ट केली. माल्यांनी लिहिलं, “आरसीबीचं अव्वल चारमध्ये पोहचण्यासाठी आणि आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी हार्दिक अभिनंदन. संघानं निराशाजनक सुरुवातीनंतर निर्धार आणि कौशल्य दाखवून ट्रॉफीच्या दिशेनं कूच केली आहे.”
Heartiest congratulations to RCB for qualifying in the top four and reaching the IPL playoffs. Great determination and skill have created a winning momentum after a disappointing start. Onward and upward towards the trophy.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) May 18, 2024
चेन्नईविरुद्धचा सामना आरसीबीनं 27 धावांनी जिंकला. प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी फाफच्या टीमला चेन्नईला किमान 18 धावांनी पराभूत करायचं होतं. आरसीबीच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला.
विजय मल्ल्या यांनी आयपीएल 2008 मध्ये आरसीबीची टीम खरेदी केली होती. त्यावेळी ते ‘किंगफिशर एअरलाइन्स’ आणि ‘युनायटेड स्पिरिट्स’चे अध्यक्ष होते. मात्र, 2016 मध्ये त्यांना कर्ज थकबाकीदार घोषित करण्यात आलं. अशा परिस्थितीत संघाची मालकी युनायटेड स्पिरिट्सकडे गेली आणि दिवाळखोर घोषित झाल्यानंतर विजय मल्ल्या दुबईत स्थायिक झाले. मात्र, एक गोष्ट आहे की ते क्रिकेटचे शौकीन आहेत आणि ते परदेशात अनेकदा सामने पाहायला पोहचले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! धोनीच्या षटकारामुळे जिंकली आरसीबी, कशी ते जाणून घ्या






