इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात भारतीय संघाला सातत्याने खेळाडूंच्या दुखापतीची समस्या सतावत आहे. आता भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकरला दुखापत झाली आहे. पण चांगली बातमी म्हणजे त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची नाही.
पीटीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार शंकरच्या पायाच्या बोटाला बुधवारी(19 जून) सराव सत्रादरम्यान जसप्रीत बुमराहने टाकलेला यॉर्करचा चेंडू लागला आहे. त्यामुळे शंकरला वेदना झाल्या होत्या.
याबद्दल पीटीआयला एका सुत्राने सांगितले की ‘विजयला वेदना झाल्या होत्या, पण तो संध्याकाळपर्यंत बरा होईल. आशा आहे की घाबरण्यासारखे काही नसावे.’
शंकरने 16 जूनला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून विश्वचषकात पदार्पण केले होते. विश्वचषकातील पदार्पणाच्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. त्याने या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने नाबाद 15 धावा केल्या होत्या.
पण याच सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. त्यामुळे तो जास्तीत जास्त पुढील तीन सामन्यातून बाहेर पडला असल्याचे कर्णधार विराट कोहलीने सांगितले आहे.
त्याचबरोबर भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन या विश्वचषकातून डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी रिषभ पंतचा या विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
या विश्वचषकात भारताचा पुढील सामना 22 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना साऊथँम्पटनला होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–काय सांगता! टी२० सामन्यात या संघाने केले तब्बल ३१४ धावा, तर दुसरा संघ १० धावांवर सर्वबाद
–असा पराक्रम करणारा हाशिम अमला ठरला विराट कोहलीनंतरचा दुसरा क्रिकेटपटू
–केवळ तीन दिवसांपूर्वी रोहित शर्माने केलेला तो विक्रम आता झाला विलियम्सनच्या नावावर