इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २९ वा सामना रविवारी (दि. १७ एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. एमसीए स्टेडियम पुणे येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात गुजरातने एक चेंडू राखत ३ विकेट्सने विजय मिळवला. यासह गुजरातने हंगामातील पाचवा विजय मिळवला. तर, चेन्नईचा हा सहा सामन्यातील पाचवा पराभव ठरला. हा सामना गुजरातने जिंकला असला तरी, त्यांच्या संघाचा अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) याच्यावर क्रिकेट चाहते चांगलेच तुटून पडले आहेत.
पुन्हा एकदा अपयशी ठरला विजय शंकर
भारतीय संघासाठी काही सामने खेळलेला विजय शंकर यावर्षी गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. मात्र, स्पर्धेत तो अद्याप चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याला सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली जातेय. चेन्नई विरुद्ध ही तो दोन चेंडूत एकही धाव न करता माघारी परतला. यानंतर चाहत्यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. काहींनी तर तू नक्की क्रिकेटरच आहेस ना? अशा शब्दात त्याला ट्रोल केले. तर काहींनी अनेक मजेदार मीम्स बनवत त्याच्यावर टीका केली.
I have a question for Vijay Shankar. pic.twitter.com/t8wmRRyJoO
— Vyom Mankad (@vyom_mankad) April 17, 2022
Forget Tapu, even Pinku is better than Vijay Shankar. #VijayShankar #GTvCSK #IPL pic.twitter.com/3xNpy6y1up
— Vikas Shukla (@VikasMic) April 17, 2022
https://twitter.com/SushilSmith49/status/1515731752731308033?t=sKs7UApr0_7OTKUEIkBUpw&s=19
गुजरातचा पाचवा विजय
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा उभारल्या. हंगामात ऋतुराज गायकवाडने प्रथमच अर्धशतक साजरे केले. तर अंबाती रायडू व कर्णधार रवींद्र जडेजाने आक्रमक खेळ केला. प्रत्युत्तरात, नियमित कर्णधार हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या गुजरातची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांनी आपले पहिले पाच बळी खुप लवकर गमावले. मात्र, डेव्हिड मिलरने अखेरपर्यंत नाबाद राहत ९४ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. प्रभारी कर्णधार राशिद खानने आक्रमक ४० धावांचे योगदान दिले. सामनावीर म्हणून डेव्हिड मिलरची निवड करण्यात आली. यासह गुजरात गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट
मानहानीकारक पराभवानंतर जडेजा झाला व्यक्त; म्हणाला, त्या कारणामुळे आम्ही हरलो