---Advertisement---

प्रतिष्ठेच्या फाईट आधी विजेंदरची सिंहगर्जना! म्हणाला…

On: बुधवार, ऑगस्ट 17, 2022 4:31 PM
---Advertisement---

ऑलम्पिक खेळात बॉक्सिंगमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारा बॉक्सर विजेंदर सिंग हा सध्या व्यावसायिक बॉक्सर बनला आहे. भारताच्या सर्व यशस्वी पुरुष बॉक्सर्सपैकी एक असलेला विजेंदर बऱ्याच कालावधीनंतर बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार आहे. १७ ऑगस्ट रोजी रायपूर येथे तो घानाचा बॉक्सर एलेसे सुले याच्याशी दोन हात करेल. या लढतीपूर्वी विजेंदर पत्रकारांना सामोरा केला व त्याने एक महत्त्वाचे विधान केले

या महत्त्वाच्या लढतीविषय बोलताना विजेंदर म्हणाला,

” तो पूर्णपणे तयार आहे. माझी टीम गेल्या १९ महिन्यांपासून माझ्यासोबत सतत काम करत आहे. मात्र, माझी तयारी किती चांगली आहे, हे या लढतीत दिसून येईल. मला सुलेशी लढायचे आहे. मी या बॉक्सरबद्दल माहित असलेल्या सर्व गोष्टींचा आढावा घेतला असून, आता मी सामन्यासाठी तयार आहे. या घानाच्या बॉक्सरचा नॉकआउट रेकॉर्ड आहे, परंतु मी या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मी पूर्वीपेक्षा मजबूत आणि फिट आहे.”

याबरोबरच नुकत्याच संपलेल्या बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सने केलेल्या कामगिरीमुळे आपण खुश झाल्याचे त्याने म्हटले. काही हक्काची पदके हुकल्याची खंत देखील त्याने यावेळी व्यक्त केली.

हौशी बॉक्सिंग सोडल्यानंतर विजेंदरने २०१५ मध्ये व्यावसायिक बॉक्सिंग करण्यास सुरुवात केली होती. आजवर त्याचा रेकॉर्ड हा शानदार राहिला आहे. त्याने आजवर खेळलेल्या १३ पैकी १२ फाईट जिंकल्या आहेत. मात्र, अखेरच्या वेळी २०२१ मध्ये गोवा येथे खेळली फाईट त्याला गमवावी लागली होती. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचा त्याचा मानस असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘पाकिस्तान विरुद्ध नाही, ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळा’; टीम इंडियाला ‘दादा’ने दिला प्रेमाचा सल्ला

देशातील बड्या नेत्याच्या मुलाचं क्रिकेट असोसिएशनमधील मोठं पद जाणार! सुप्रिम कोर्ट ठरतंय अडथळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---