प्रो कबड्डीचा आठव्या हंगाम (Pro Kabaddi Season 8) २२ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या हंगामासाठी आता सर्व संघांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, हरियाणा स्टीलर्सने या हंगामासाठी स्टार रेडर विकास कंडोला याला (Vikash Kandola) कर्णधार म्हणून घोषित केलं आहे.
हरियाणा स्टीलर्सचा (Haryana Steelers) पहिला सामना २३ डिसेंबरला पटना पायरेट्ससोबत (Patna Pirates) आहे. कंडोलाने मागच्या हंगामात उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं. १९५ पॉईंट्स मिळवले होते. तो त्याचा ६वा सर्वाधिक स्कोर होता.
कंडोलाने आतापर्यंत ५५ सामन्यात ७.६९ च्या सरासरीने एकूण ४२३ रेड पॉईंट्स मिळवले आहेत. विकास कंडोलाला कर्णधार बनवल्यानंतर तो म्हणाला, “मला हरियाणा स्टीलर्सचा कर्णधार झाल्यामुळे सन्मानित झाल्यासारखं वाटतंय. मी तीन हंगामांपासून या संघासोबत आहे. मी नक्कीच माझ्याकडून १००% योगदान देऊन खेळण्याचं काम केलं आणि संघाला पुढे घेऊन गेलो. आमच्याकडे अनुभवी आणि तरुण खेळाडूंचं मिश्रण आहे आणि आम्ही नक्कीच चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू.”
स्टार रेडर विकाश ‘उड़न’ कंडोला सीजन 8 में हरियाणा स्टीलर्स का नेतृत्व करेंगे! 🚨
भाई कती #DhummaThaaDenge इस बार! 🔥🏆
Star Raider Vikash ‘Udan’ Kandola to lead the Haryana Steelers in Season 8! ⚡️#VivoProKabaddi #KaptaanKandola pic.twitter.com/TTlS77ZW0h
— Haryana Steelers (@HaryanaSteelers) December 18, 2021
साल २०१९ मध्ये ५ व्या क्रमांकावर राहिलेल्या हरियाणा स्टीलर्सने २०२१-२२ हंगामासाठी रोहित गुलिया, मोहम्मद इस्माईल मघसोडलौ, हामिद मिर्जाई नादर, राजेश नरवाल, बृजेंद्र सिंह चौधरी, अजय घंघास, विकास जगलान, रवि कुमार, सुरेंद्र नाडा, राजेश गुर्जर यांना संघात सामील करून घेतलं.
प्रो कबड्डी २०२१ लिलाव (Pro Kabaddi Auction 2021) २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान मुंबईमध्ये करण्यात आला होता. हरियाणा स्टीलर्सने २०१९ मध्ये संघाकडून खेळलेल्या विकास कंडोला, विनय (Vinay), विकास छिल्लर (Vikas Chhillar) आणि चांद सिंगला (Chand Singh) २०२१-२२ हंगामासाठी रिटेन केलं होतं.
प्रो कबड्डीचा आठवा हंगाम बंगळुरूमध्ये जैव सुरक्षित वातावरणात (Bio Bubble) होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
- वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये किदांबी श्रीकांत पराभूत, पण रौप्यपदक जिंकून रचला इतिहास
- “रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसेही खर्च करू शकतो”, संघसहकाऱ्याकडून कर्णधाराचे कौतुक
- राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: युवा महाराष्ट्रासमोर आज पंजाबचे तगडे आव्हान