---Advertisement---

विराटचे नाव घेतल्याशिवाय काहींची डाळ शिजत नाही! मांजरेकरांच्या टीकेला विकास कोहलीचे सडेतोड उत्तर

On: शुक्रवार, जानेवारी 9, 2026 9:29 PM
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर भाष्य केले होते. विराट आपली तंत्रशुद्ध फलंदाजी आणि खेळ सुधारू शकला असता, पण त्याने घाईत निवृत्ती घेतली, असे मांजरेकर म्हणाले होते. आता विराटचा भाऊ विकास कोहली याची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्याकडे मांजरेकरांना दिलेले उत्तर म्हणून पाहिले जात आहे.

विकास कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, असं वाटतंय की विराट कोहलीचं नाव घेतल्याशिवाय काही लोकांची डाळ-रोटी चालत नाही. त्याने कोणाचेही नाव घेतले नसले तरी, ही चपराक संजय मांजरेकर आणि विराटच्या इतर टीकाकारांना असल्याचे मानले जात आहे.

मांजरेकर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून विराटच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले की, एकीकडे जो रूट, केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ हे खेळाडू आपले कसोटी करिअर अधिक मजबूत करत नवनवीन विक्रम रचत आहेत, अशा वेळी विराटचे कसोटी क्रिकेट सोडून जाणे खटकते. गेल्या काही वर्षांत विराटचा कसोटी फॉर्म खराब होता. विराटने आपल्या तांत्रिक आणि मानसिक चुका सुधारण्याचा प्रयत्न केला नाही, अशी टीका मांजरेकरांनी केली.

जर विराटला हवे असते, तर त्याने काही काळ विश्रांती घेतली असती किंवा संघातून बाहेर पडून आपल्या उणिवांवर काम केले असते, असा सल्ला मांजरेकरांनी दिला. विराटने कसोटी क्रिकेट सोडले पण वनडे (एकदिवसीय) क्रिकेट खेळणे सुरू ठेवले, याबद्दल मांजरेकरांनी अधिक नाराजी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---