---Advertisement---

‘एका संघात सर्व ११ खेळाडू पुजारा किंवा पंतसारखे नको असतात,’ संघ प्रशिक्षकाचे बोल

On: शनिवार, जून 5, 2021 6:16 PM
---Advertisement---

क्रिकेट चाहत्यांच्या मनात अनेकदा असा प्रश्न येतो की, आक्रमक फलंदाज आणि अनेक तास मैदानावर शांतचित्ताने उभे राहून विरोधी गोलंदाजांना थकविण्यास सक्षम असलेल्या फलंदाजाच्या वैयक्तिक जीवनात काय फरक असेल? या प्रश्नाचे उत्तर त्या खेळाडूंच्या प्रशिक्षकाशिवाय कोणीही देऊ शकत नाही. अशाच एका प्रश्नाचे उत्तर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी दिले आहे. त्यांनी आक्रमक यष्टीरक्षक रिषभ पंत आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यांच्या संदर्भात बोलताना या गोष्टींचा उलगडा केला.

दोघांचे स्वभाव भिन्न
भारतीय संघासोबत सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेले विक्रम राठोर यांनी भारतीय संघातील या दोन्ही खेळाडूंविषयी बोलताना म्हटले की,
“पुजारा खूप समर्पित, खूप उत्कट आणि अत्यंत शिस्तबद्ध आहे. सामान्यतः वैयक्तिक आयुष्यातही तो असाच असतो. त्याची एक अतिशय कठोर दिनचर्या आहे आणि तो तिचे काटेकोरपणे अनुसरण करतो. दुसरीकडे आपल्याकडे संघात पंत आहे. जो निर्भय आहे, त्याला खूप मजा करायची असते, त्याला जोखीम घ्यायला आणि गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवायला आवडते. वैयक्तिक आयुष्यातही तो फारसा वेगळा नाही.”

राठोर आपले मत पुढे नेताना म्हणाले, “एका संघात सर्वच्या सर्व ११ खेळाडू पुजारासारखे नको असतात आणि पंतसारखेही नको असतात. संघ बनवताना आपल्याला संघाच्या संतुलनाचा विचार करावा लागतो.”

विक्रम राठोर हे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून २०१९ पासून काम पाहतात. यापूर्वी ते भारताच्या निवड समितीचे सदस्य देखील होते. त्यांनी भारतीय संघाचे ६ कसोटी व ७ वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केले. सध्या ते भारतीय संघासोबत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहेत.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मयंक अगरवाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा व मोहम्मद सिराज.

महत्त्वाच्या बातम्या-

वय छोटे पण पराक्रम मोठे! २४व्या वर्षापर्यंत ‘या’ भारतीयांनी पार केले षटकारांचे ‘अर्धशतक’

कमालच नाही का! ‘दादा’ अन् त्याचा रेकॉर्ड ब्रेकर डेव्हन कॉनवेमध्ये आहेत ‘या’ ६ गोष्टी समान

फलंदाजांची फिरकी घेणारा भज्जी बनला ‘कूक’, त्याने बनवलेला पदार्थ बघून तोंडात येईल पाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---