केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना (Sa vs Ind 3rd test) सुरू आहे. हा सामना मालिका जिंकण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. ज्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
पहिल्या दिवशी दोन्ही भारतीय संघातील फलंदाजांमध्ये आणि दक्षिण आफ्रिका संघातील गोलंदाजांमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली. परंतु, विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) वगळता कुठल्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ज्यामुळे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram rathour) नाराज झाले आहेत. पहिल्या दिवसाचा (११ जानेवारी ) खेळ झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram rathour statement) यांनी म्हटले की, “विराट कोहली ज्याप्रकारे फलंदाजी करत होता, त्यावरून मला काहीच चिंता वाटली नाही. माझं असं म्हणणं आहे की, तो आधीपासूनच चांगली फलंदाजी करतोय. एक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून मला कधीच त्याच्या फलंदाजीची चिंता वाटली नाही. तो नेट्समध्ये चांगला सराव करत होता, तो सामन्यात देखील चांगली कामगिरी करतोय, त्याला चांगली सुरुवात देखील मिळत आहे.”
अधिक वाचा – ‘जग जसं पाहतं तसं मी स्वतःकडे कधीच पाहत नाही’, विराट कोहलीचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
तसेच ते पुढे म्हणाले की, “आज (११ जानेवारी ) एक खूप चांगली संधी होती. तो शिस्तबद्ध पद्धतीने खेळत होता. तो मोठी खेळी करू शकला असता. परंतु तो ज्याप्रकारे खेळला, त्याचा मला आनंद आहे.” विराट कोहलीने या डावात २०१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ७९ धावांची खेळी केली.
व्हिडिओ पाहा – द्रविडला ‘जॅमी’ टोपणनाव पडलं तरी कसं?
तसेच विक्रम राठोड भारतीय संघातील इतर फलंदाजांच्या कामगिरीवरून निराश झाले होते. त्यांनी म्हटले की, “ही आव्हानात्मक परिस्थिती आहे जिथे धावा काढणे सोपे नसते. पण आम्ही खूप खराब खेळलो. आम्ही आणखी ५० ते ६० धावा जोडू शकलो असतो, आम्हाला किमान अशीच अपेक्षा होती.”
भारताचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून विराटने ७९ धावा केल्या, तर चेतेश्वर पुजाराने ४३ धावांची खेळी केली. याशिवाय कोणाला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या :
सिडनी कसोटीत दोन शतकांसह दणक्यात पुनरागमन करणाऱ्या ख्वाजासाठी वॉर्नर भावुक; म्हणाला, ‘स्वप्न अशीच…’
वन मॅन आर्मी! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाकी झुंज देणाऱ्या कोहलीचे होतंय भरभरून कौतुक, पाहा खास ट्वीट्स
भारीच ना!! टप्पा पडताच बुमराहच्या चेंडूने बदलला काटा; काही कळायच्या आत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बाद
हे नक्की पाहा:






