इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील दोन्ही डावात भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
अनेक दिग्गजांनी असे म्हटले होते की, अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये नसल्यामुळे विराटने जडेजाला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले आहे. परंतु, आता फलंदाजी प्रशिक्षकांनी जडेजाला पाचव्या क्रमांकावर खेळवण्यामागे नक्की कारण काय होते, याचा खुलासा केला आहे.
जडेजाला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याबाबत विक्रम राठोड म्हणाले की, “तसं पाहायला गेलं की, दोन्ही डावात आम्हाला याचा फायदा झाला. दुसऱ्या डावात त्याने विराट कोहली सोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली होती. जडेजाला बढती देण्याचा निर्णय तात्पुरता आहे. पुढेही तोच या क्रमांकावर खेळेल की नाही, याविषयी संघाने अजून ठोस निर्णय घेतलेला नाही. जडेजाला पाचव्या क्रमांकावर पाठवण्यामागचे कारण, आम्हाला उजव्या आणि डावखुऱ्या फलंदाजांचे संतुलन बनवून ठेवायचे आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “यापूर्वी आमचे दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज ( रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा) सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी यायचे. आम्हाला दोन डाव्या हाताच्या फलंदाजांमध्ये अंतर हवे होते. ही एक साधी आणि सोपी रणनिती होती. जडेजाने यापूर्वी देखील फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. एक संघ म्हणून आम्हाला पाहायचे होते, की आमचा मध्यक्रम कशाप्रकारे संतुलित होऊ शकतो. सामन्याच्या पाचव्या दिवशी रवींद्र जडेजाची भूमिका महत्वाची असेल.”(Vikram rathour statement on Ravindra Jadeja’s promotion)
रवींद्र जडेजाने या सामन्यातील पहिल्या डावात ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना अवघ्या १० धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात तो १७ धावा करत माघारी परतला होता. या खेळी दरम्यान त्याने विराट कोहली सोबत महत्वपूर्ण भागीदारी केली होती. भारतीय संघाला दुसऱ्या डावात ४६६ धावा करण्यात यश आले आहे. दरम्यान भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“तो असायला हवा होता”, चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्याने चाहत्यांना आली अश्विनची आठवण
मायकल वॉनने पुन्हा तमाम भारतीयांच्या जखमेवर चोळले मीठ; अश्विनशी निगडित केले असे ट्विट
‘भारत आर्मी’चा इंग्लडमध्ये जल्लोष, विराटसाठी खास डान्स, व्हिडिओ व्हायरल