---Advertisement---

आख्खं जग वाईट बोलत असताना मिर्झापूरमधल्या ‘बबलू भैया’ने केली कर्णधार रोहितची पाठराखण, शेअर केली खास पोस्ट

On: गुरूवार, सप्टेंबर 8, 2022 3:45 PM
Rohit-Sharma-Babalu-Bhaiyya
---Advertisement---

यंदाच्या आशिया चषक 2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला सुपर-4 च्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून रोहितच्या कर्णधारपदावर सातत्याने टीका होत आहे. दरम्यान, रोहितला बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसीची साथ लाभली आहे.

खरे तर श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात भारताला क्लोज मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यापासून समीक्षक रोहितच्या कर्णधारपदावर सातत्याने निशाणा साधत आहेत. दरम्यान, मिर्झापूर फेम विक्रांतने रोहितला उत्तम साथ दिली आहे. त्याने आपल्या ट्विटर डीपीवर भारतीय कर्णधार रोहित शर्माचा फोटो टाकला आहे. यासोबतच त्याने रोहितचा हार्ट इमोजी असलेला फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. असे करून त्याने या कठीण काळात रोहितचा हात धरला आहे. विक्रांतचे हे सहकार्य सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहे.

https://www.instagram.com/p/CiNxfywIT80/?utm_source=ig_web_copy_link

अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर अर्शदीप सिंगला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्याच्यावर अनेक असभ्य कमेंट्सही पाहायला मिळाल्या. या सगळ्यात अनेकांनी अर्शदीपची बाजू घेतली. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने आपल्या डीपीवर अर्शदीपचा फोटो टाकला होता. आता असाच काहीसा सपोर्ट विक्रांत मेस्सीने रोहित शर्माबाबत केला आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने अ गटातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. यानंतर, आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने हाँगकाँगवर 40 धावांनी विजय मिळवला. त्याचवेळी, सुपर-4 मधील त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्ध पाच विकेट्सनी पराभव झाला. यानंतर भारताचा श्रीलंकेकडून सहा गडी राखून पराभव झाला. आता सुपर-4 मधील शेवटच्या सामन्यात आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताला विश्वचषक जिंकण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंडला सामोरे जावे लागेल, वाचा T20WCचे सुधारित वेळापत्रक
पीएसएलच्या ‘फ्लॉप शो’ नंतर पाकिस्तानचा आणखी एक ‘पीजे’, पीसीबीने केली मोठी घोषणा
आशिया चषकात ‘या’ तीन चुका भारताला पडल्या महागात; जर टाळल्या तर टी-20 विश्वचषक आपलाच!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---