---Advertisement---

तेंडुलकर करंडक १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत क्रिश शहापुरकरच्या शतकी खेळीसह विलास इलेव्हन संघाचा विजय

On: गुरूवार, फेब्रुवारी 13, 2020 9:00 PM
---Advertisement---

पुणे। विलास इलेव्हन यांच्या वतीने आयोजित तेंडुलकर करंडक 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत क्रिश शहापुरकरच्या शतकी खेळीसह विलास इलेव्हन संघाने एनोएसएफए संघाचा 81 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

डीएसके विश्व स्टार क्रिकेट अकादमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत क्रिश शहापुरकरच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या बळावर विलास इल्व्हन संघाने एनएसएफए संघाचा 81 धावांनी दणदणीत पराभव केला. विलास इल्व्हन संघाने 20 षटकात 2 बाद 217 धावांचा डोंगर रचला. क्रिश शहापुरकरने 11 चौकार व 7 षटकारांसह केवळ 54 चेंडूत शतकी खेळी केली. यात साहिल नालगे याने 37 चेंडूत 59 धावा करून क्रिशला सुरेख साथ दिली. 217 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यश तुंगेच्या अचूक गोलंदाजीचीपुढे एनएसएफए संघ 19.2 षटकात सर्वबाद 136 धावांत गारद झाला. यात साहिल कडने 37 व सिध्दार्थ करपेने 34 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला 54 चेंडूत 100 धावा करणारा क्रिश शहापुरकर सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत भुपेंद्र ठाकरेच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर स्टार स्पोर्टस अकादमी अ संघाने आदित्य स्पोर्टस् अकादमी संघाचा 5 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना आदित्य स्पोर्टस् अकादमी संघाने 18.2 षटकात सर्वबाद 78 धावा केल्या. 79 धावांचे लक्ष निल चव्हाणच्या 23 व मानस कोंढारेच्या 27 धावांसह स्टार स्पोर्टस अकादमी अ संघाने केवळ 12.2 षटकात 5 बाद 81 धावा करून सहज पुर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. भुपेंद्र ठाकरे सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

विलास इल्व्हन- 20 षटकात 2 बाद 217 धावा(क्रिश शहापुरकर 100(54), साहिल नालगे 59(37), विवेक नाबाद 23(13), यश तुंगे नाबाद 17(16), अजीकांत तनपुरे 1-29) वि.वि एनएसएफए- 19.2 षटकात सर्वबाद 136 धावा(साहिल कड 37(22), सिध्दार्थ करपे 34(22), यश तुंगे 4-19, अथर्व लोखंडे 2-9) सामनावीर- क्रिश शहापुरकर
विलास इलेव्हन संघाने 81 धावांनी सामना जिंकला.

आदित्य स्पोर्टस् अकादमी- 18.2 षटकात सर्वबाद 78 धावा(मनिष मंधपती 17, इशान बाफना 13, आर्य चौधरी 2-11, भुपेंद्र ठाकरे 2-7) पराभूत वि स्टार स्पोर्टस अकादमी अ- 12.2 षटकात 5 बाद 81 धावा(निल चव्हाण 23(38), मानस कोंढारे 27(18), मानस कर्वे 3-15) सामनावीर- भुपेंद्र ठाकरे
स्टार स्पोर्टस अकादमी अ संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---