---Advertisement---

कर्नाटकला दोनदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देणारा विनय कुमार आता खेळणार या संघाकडून

---Advertisement---

कर्नाटकचा माजी कर्णधार विनय कुमारने 15 वर्षांनंतर कर्नाटक क्रिकेटची साथ सोडत पुढील देशांतर्गत क्रिकेट मोसमात पुदुच्चेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 35 वर्षीय विनय कुमारच्या नेतृत्वाखाली कर्नाटकने 2013-14 आणि 2014-15 च्या मोसमात रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि इराणी कपचे विजेतेपद मिळवले आहे.

याबद्दल विनयनेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की ‘कर्नाटक संघाबरोबरील 15 वर्षांचा काळ अविस्मरणीय आणि शानदार होता. पण मी जड  आंतकरणाने कर्नाटक क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासात माझी साथ देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.’

‘कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापनाचे, माझ्या सिनियर्सचे, संघ सहकाऱ्याचे, प्रशिक्षकांचे, सपोर्ट स्टाफचे, मीडियाचे आणि कर्नाटकमधील लोकांचे, ज्यांनी माझ्यावर प्रेम केले आणि मला पाठिंबा दिला, त्या सर्वांचे आभार.’

‘काही वर्षांनी मी पुन्हा कर्नाटक क्रिकेटमध्ये येईल आणि जसे शक्य होईल तसे योगदान या संघाला देण्याचा प्रयत्न करेल. या संघाने मला खूप अनमोल आठवणी दिल्या आहेत.’

विनयने 2004-05 च्या मोसमात कर्नाटककडून बंगाल विरुद्धच्या रणजी ट्रॉफीतील सामन्यातून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

त्याने आत्तापर्यंत प्रथम श्रेणीचे 130 सामने खेळले असून 23.53 च्या सरासरीने 459 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 3025 धावाही केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

याबरोबरच त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 131 सामने खेळले असून 211 विकेट्स घेतल्या आहेत आणि 1159 धावा केल्या आहेत.

विनयने कर्नाटक क्रिकेटची साथ सोडल्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी त्याचे कर्नाटक संघाकडून केलेल्या यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/suchithj_038/status/1163831396349014016

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

स्मिथच्या दुखापतीनंतर बीसीसीआयने हेल्मेटच्या बाबतीत घेतला हा मोठा निर्णय

विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला मिळाला हा मोठा पुरस्कार

निलंबनातून दिलासा मिळाल्यानंतर श्रीसंतने व्यक्त केली ही खास इच्छा!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment