मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक क्रिकेटपटू विनायक सामंत यांची मुंंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
तर १९ वर्षाखालील मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदी विल्कीन मोटा यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव उन्मेष खानविलकर यांनी क्रिकेट सुधारणा समितीच्या बैठकीनंतर शुक्रवारी (१३ जुलै) प्रशिक्षकांच्या निवडीची घोषणा केली.
विनायक सामंत यांच्याबरोबर भारताचे माजी क्रिकेटपटू अजय रात्रा आणि रमेश पोवार या दिग्गजांनीही मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केले होते.
भारताचे माजी यष्टीरक्षक क्रिकेटपटू समिर दिघे यांनी मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रीक्त झाले होते.
विनायक सामंत यांनी त्यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत मुंबई, आसाम आणि त्रिपूरा या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
विनायक सामंत यांनी १०१ प्रथम श्रेणी सामन्यात २८.१९ च्या सरासरीने ३४९६ धावा केल्या आहे.
२००१ मध्ये विनायक सामंत यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-२८ वर्षीय माजी क्रिकेटपटूचा इंग्लंड क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये समावेश
-भारतीय अ संघाचा वेस्टइंडिज अ संघावर विजय