---Advertisement---

विनेश फोगट प्रकरणी निकाल यायला विलंब का? निर्णय 13 ऑगस्टपर्यंत पुढे का ढकलण्यात आला?

---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास 6 पदकांसह संपला. तरीही 7व्या पदकाची आशा अद्यापही कायम आहे. भारताला हे पदक मिळणार की नाही हे क्रीडा लवादाच्या (CAS) न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

विनेश फोगट 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार होती. परंतु अंतिम सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर तिनं किमान रौप्य पदक मिळावं, यासाठी अपील केलं आहे. यावर सीएएसचा निर्णय येणं बाकी आहे. 9 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये या प्रकरणाची सुनावणी 3 तास चालली, परंतु अद्याप यावर निर्णय झालेला नाही.

सुनावणीनंतर सीएएसनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, या निर्णयाची अंतिम मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे, परंतु शनिवारीही यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं सांगितलं होतं की, या मुद्द्यावर निर्णय 10 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता घेतला जाईल. परंतु त्यानंतर ही मुदत 13 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

या निर्णयाला वारंवार उशीर होण्याचं कारण आता समोर आलं आहे. वृत्तानुसार, सीएएसने विनेश फोगट आणि आयओएकडून काही अतिरिक्त कागदपत्रं मागितली आहेत. त्यासोबत काही प्रश्न देखील विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे देण्याची अंतिम मुदत 11 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार, रविवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत विनेश फोगट आणि आयओएला या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. या आधारे 13 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणार आहे.

सीएएसचा निर्णय विनेश फोगटच्या बाजूनं आल्यास भारताच्या पदकांची संख्या 6 वरून 7 वर येईल. तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी विनेश नीरज चोप्रा नंतर दुसरी खेळाडू ठरेल.

हेही वाचा – 

सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणखी एका महिला बॉक्सरवर पुरुष असल्याचा आरोप, जागतिक स्पर्धेत घातली होती बंदी
मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरी, कारण जाणून तुम्ही पण व्हाल थक्कं!
नरेंद्र मोदी स्टेडियमचा मान जाणार! भारतात या ठिकाणी बनणार जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---