भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिली आहे. ती ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर होती. आता बजरंग पुनियानेही राजीनामा दिला आहे. बजरंग आणि विनेश अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या दोघांनाही हरियाणा निवडणुकीसाठी तिकीट दिले जाऊ शकते. विनेश आणि बजरंग दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पोहोचले आहेत. येथे दोघे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत.
बजरंग आणि विनेशच्या मुद्द्यावर कुस्तीपटू साक्षी मलिकने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, हे दोघेही काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे ते राजीनामा देत आहेत. हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. आमच्या आंदोलनाला चुकीचे स्वरूप देऊ नये. महिलांसाठीची माझी चळवळ अजूनही कायम आहे. मी नेहमीच कुस्तीच्या हिताचा विचार केला आहे.
#WATCH | Bajrang Punia arrives at the residence of Congress national president Mallikarjun Kharge, in Delhi. pic.twitter.com/hzl0l05rnR
— ANI (@ANI) September 6, 2024
कुस्तीपटू बजरंग पुनिया हा भारतीय रेल्वेमध्ये विशेष कर्तव्य अधिकारी या पदावर होता. मात्र आता त्याने राजीनामा दिला आहे. हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष बजरंगलाही तिकीट देऊ शकतो. हरियाणात 5 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका आहेत. 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. पण त्याआधी निवडणुका 1 आणि 4 तारखेला होणार होते. मात्र, आता तारीख बदलली आहे.
तत्पूर्वी विनेश फोगटने सोशल मीडियावर पोस्ट करत राजीनामा जाहीर केली होती. विनेश फोगटने कॅप्शनमध्ये लिहिले -भारतीय रेल्वेची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. माझ्या आयुष्याच्या या वळणावर, मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे माझे राजीनामा पत्र सादर केले आहे. देशसेवेसाठी रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराचा सदैव ऋणी राहीन. विनेश फोगटचे राजीनामा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपले फीडबॅक देत आहेत.
भारतीय रेलवे की सेवा मेरे जीवन का एक यादगार और गौरवपूर्ण समय रहा है।
जीवन के इस मोड़ पर मैंने स्वयं को रेलवे सेवा से पृथक करने का निर्णय लेते हुए अपना त्यागपत्र भारतीय रेलवे के सक्षम अधिकारियों को सौप दिया है। राष्ट्र की सेवा में रेलवे द्वारा मुझे दिये गये इस अवसर के लिए मैं… pic.twitter.com/HasXLH5vBP
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) September 6, 2024
हेही वाचा-
मुशीर खानचं नाव दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अजरामर, नवदीप सैनीसोबत मिळून रचला अद्भुत रेकॉर्ड!
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे 5 फलंदाज; जाणून घ्या कोणा-कोणाचा समावेश
विकेटकीपरच्या चुकीची शिक्षा गोलंदाजाला, क्रिकेटच्या या अनोख्या नियमामुळे चाहते गोंधळात